Angry citizens bathe in Ajit Pawar’s photo after water supply was cut off for a month


एका बाजूला दुष्काळाची परिस्थिती, तर दुसरीकडे पाणीपुरवठा खंडीत झाल्यामुळे संतप्त झालेल्या बीडच्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. सध्या पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला बीडच्या नागरिकांनी अभ्यंग स्नान घातले.

बीड : मराठवाडा दुष्काळमुक्त करू, अशी राजकीय घोषणाबाजी वारंवार केली जात असली तरी ते प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मराठवाडा जिल्ह्याला दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या दुष्काळाच्या परिस्थितीत बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजल्यामुळे महिनाभरापासून तेथील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. एका बाजूला दुष्काळाची परिस्थिती, तर दुसरीकडे पाणीपुरवठा खंडीत झाल्यामुळे संतप्त झालेल्या बीडच्या नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. सध्या पालकमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला बीडच्या नागरिकांनी अभ्यंग स्नान घातले. (Angry citizens bathe in Ajit Pawar’s photo after water supply was cut off for a month)

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहराला माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. मात्र काडी वडगाव परिसरात मुख्य जलवाहिनी चौदाशे मीटर गंजली आहे. त्यामुळे गेल्या 32 दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. आधीच दुष्काळ परिस्थिती त्यात महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडीत झाल्यामुळे त्याठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत. कुठे गेली 114 कोटी रुपयांची अमृत अटल योजना? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडच्या नागरिकांची व्यथा जाणून घेऊन तत्काळ प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी आज अजित पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्नान घालून राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा संतप्त नागरिकांकडून प्रयत्न झाला.

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपासोबत राहून ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, राऊतांचा अजित पवारांना टोला

बीड शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी गंजलेल्या जलवाहिनीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी गंजलेली पाइप लाइन ठीक करण्यासाठी आमदार निधीतून 720 मीटर पाइपलाइन देखील दिली आहे. मात्र पाइपलाइन बदलण्यास आणखी सहा दिवस लागतील असा अंदाज बांधला जात आहे. तसेच दुष्काळाची परिस्थिती बघता पुढील काळात बीड शहराला आठ दिवसांनी पाणीपुरवठा होईल, अशी माहिती संदीप क्षीरसागर यांनी सांगितली.

हेही वाचा – Chitra Wagh Vs Supriya Sule : तुष्टीकरणाचे राजकारण सुचतंय का? पौडमधील घटनेवरून चित्रा वाघ आक्रमक



Source link

Comments are closed.