Bachchu Kadu’s statement about taking Pakistan into India is under discussion
तीन दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर युद्धविराम झाला. यानंतर विरोधक मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. दरम्यान, याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याची देखील माहिती दिली.
Bacchu Kadu on India Pakistan War : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याक्त काश्मीरच्या 9 तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर युद्धविराम झाला. यानंतर विरोधक मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. अशातच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. दरम्यान, याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करणार असल्याची देखील माहिती दिली. (Bachchu Kadu’s statement about taking Pakistan into India is under discussion)
माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, पाकिस्तानचे भारतावर नेहमी-नेहमी वार सुरू असतात. त्यामुळे आता पाकिस्तानचे नेहमीचे दुखणं बंद केलं पाहिजे. इंदिरा गांधी यांनी जसं बांगलादेश वेगळा काढला होता, तसाच आता पाकिस्तान भारतात घ्यावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी असेही म्हटले की, या कारवाईसाठी जर सैनिक कमी पडत असतील तर प्रहारचा कार्यकर्ते आणि मी स्वत: तयार आहे. दरम्यान, बच्चू कडू यांनी पाकिस्तान भारतात घेण्याचे वक्तव्य केल्यामुळे आता सत्ताधारी त्यांच्यावर टीका करताना दिसतील.
फडणवीस यांच्या घरासमोर मुक्कामी आंदोलन करणार
महायुती सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने बच्चू कडू यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माहिती देताना बच्चू कडू म्हणाले की, दोन जूनला आमचं आंदोलन सुरू होईल आणि 3 जूनला आमची बारामतीत सभा होईल. त्यानंतर तीन तारखेला पंकजा मुंडे, चार तारखेला बाळासाहेब पाटील, पाच तारखेला संजय राठोड यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. सात जूनला देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आमचं मुक्कामी आंदोलन राहील. कोरोना काळात ताटं वाजवण्यात आली होती, त्यामुळे कर्जमाफीच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम्ही देखील ताटं वाजवणार आहोत. बावनकुळे यांनी सांगितले आहे की, आम्ही पाच वर्षात कधीही कर्जमाफी करू. पण जनतेला फसवण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यामुळे वेळ पडली तर आम्ही स्वत: गुन्हे दाखल करून न्यायालयात जाऊ, असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : ठाकरे अन् पवार गटात वादाचे खटके? राऊतांनी केलेल्या विधानाने खळबळ
Comments are closed.