Bjp state president chandrashekhar bawankule slams harshwardhan sapkal over tender statement in marathi
सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणतात, सपकाळांना मोठा पल्ला गाठावा लागेल, पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या निविदेबद्दल जो गोंधळ झाला, त्याचीही सविस्तर माहिती दिली.
Chandrashekhar Bawankule On Sapkal : मुंबई : राज्यासमोरील आर्थिक संकट आता अधिक तीव्र झाले असून, महसुली उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने सर्वच स्तरावर काटकसरीचे धोरण स्वीकारले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींची संख्या दरमहा कमी केली जात असून शिवभोजन आणि आनंदाचा शिधा योजनेवरही गदा आली आहे. एका बाजूना जनतेच्या सोयी-सुविधांना कात्री लावत असताना दुसरीकडे मात्र पुढील मंगळवारी (29 एप्रिल 2025) अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी कोट्यवधींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यासंबंधीची निविदाही जारी करण्यात आली आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. (bjp state president chandrashekhar bawankule slams harshwardhan sapkal over tender statement)
या निविदेची छापील प्रत सोशल मीडियावर शेअर करत सपकाळ म्हणतात की, जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर पंचतारांकित सुविधा भोगत आहेत. राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारने
ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली. लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यांमध्ये घट करण्यासोबतच निवडणुकीच्या वेळी कबूल केलेले प्रति महिना 2100 रुपये दिले नाहीत. आणि चोंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि व्यवस्थेसाठी 15 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.
हेही वाचा – Harshwardhan Sapkal : जनता आर्थिक अडचणीत, सत्तासूर पंचतारांकित सुविधात… सपकाळांचा हल्लाबोल
सपकाळांच्या या प्रतिक्रियेवरच बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत ते म्हणतात, सपकाळांना मोठा पल्ला गाठावा लागेल, पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच या निविदेबद्दल जो गोंधळ झाला, त्याचीही सविस्तर माहिती दिली.
सपकाळ अजून खूप लहान आहेत…
मोठा पल्ला त्यांना गाठावा लागेल, पण त्यासाठी आधी पोरकटपणा सोडून द्यावा लागेल. झाले असे की, चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी काल दि. 21 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर… pic.twitter.com/IUvzEtRqcW— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) April 22, 2025
चौंडी येथील प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीसाठी दि. 21 एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, अहिल्यानगरने एक जाहिरात प्रकाशित केली. या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती दीड कोटींची असल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद आहे. ती मराठी आणि लोकमत अशा दोन वर्तमानपत्रात प्रकाशित झाली. मराठी त ती योग्य प्रकाशित झाली आहे. पण लोकमतमध्ये शेवटच्या दोन शून्यापूर्वी असलेला टिंब अनवधानाने काढून टाकण्यात आल्याने ती 150 कोटींची दिसते. वास्तविक ही त्या वर्तमानपत्राची तांत्रिक चूक आहे. कॅामा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्राने अनवधानाने गल्लत केल्याने असा प्रकार झाला आहे. वर्तमानपत्रांना दिलेला जाहिरातीचा रिलीज ऑर्डर किंवा संकेतस्थळावर ती बिनचूक आहे.
असे असतानाही सपकाळ माध्यमांत झळकत राहण्यासाठी असा पोरकटपणा करतात तेव्हा त्यांची कीव येते. त्यांच्याबद्दल कणव व्यक्त करण्याशिवाय आणखी काही करता येईल असे वाटत नाही, असेही बावनकुळे यांनी शेवटी म्हटले आहे.
Comments are closed.