CM Devendra Fadnavis on Pakistani Citizens in Maharashtra pup
एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
पुणे : जम्मू येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना 1 मे आधी देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांविषयी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. पाकिस्तानी नागरिकांविषयी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रविवारी, 27 एप्रिलला माध्यमांशी बोलताना त्यांनी पाकिस्तांनी नागरिकाचा बंदोबस्त केल्याचं सांगितलं आहे. (CM Devendra Fadnavis on Pakistani Citizens in Maharashtra )
एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गृहमंत्री म्हणाले की, पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात कृपया चुकीच्या बातम्या करु नका. माध्यमांनी 107 नागरिक हरवले असल्याच्या बातम्या केल्या आहेत. परंतु राज्यातील एकही पाकिस्तानी नागरिक हरवले नाहीत. सर्वच पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. आता एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सर्वांना पाकिस्तानात पाठवण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य विषयांवरही भाष्य केलं आहे. फडणवीस म्हणाले की, शहरातील फ्लेक्स काढायला हवेत. त्यामुळे शहरांचं सौंदर्य खराब होतं. तसंच राज्यातील पाणी टंचाईवर बोलताना ते म्हणाले की, एप्रिल- मे महिन्यांत पाणीसाठा कमी असतो. ही परिस्थिती पहिल्यांदा आलेली नाही. दरवर्षी अशी परिस्थिती असते. मागील वर्षीही एप्रिल-मे महिन्यांत 32 टक्के पाणीसाठा होता. यावर्षी तो 38 टक्के पाणीसाठा आहे. म्हणजेच मागील वर्षापेक्षा चांगली परिस्थिती आहे. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. परंतु लहान धरणांमध्ये जलसाठा कमी झाला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
इराण आणि युएई या मुस्लीम देशांचा भारताला पाठिंबा
पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच भारताला जगभरातील अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. यात काही मुस्लीम देशांचाही समावेश आहे. इराण आणि युएई या दोन मुस्लीम देशांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा : (Indo-Pak Line of Control : पाकिस्तानात PoKवर आणीबाणी; सीमेवर गोळीबार, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द)
Comments are closed.