Cm devendra fadnavis reacted to vijay wadettiwar statement on the claims made by the families of the victims in pahalgam in marathi


वडेट्टीवार यांचे हे विधान असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.

Devendra Fadnavis On Wadettiwar : मुंबई : दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. पहलगामला आलेल्या या पर्यटकांच्या कुटुंबातील पुरुषांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून मग आपल्या नातेवाईकांसमोरच गोळ्या घातल्या. त्यामुळे देशभरात या हल्ल्याविरोधात तीव्र संताप आहे. सगळ्यांच्याच मनात या हल्ल्याविरोधातील आग धगधगते आहे. असे असतानाही अजूनही महाराष्ट्रात यावरून राजकारण होताना दिसते आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (cm devendra fadnavis reacted to vijay wadettiwar statement on the claims made by the families of the victims in pahalgam)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. पहलगाम येथे ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांच्या नातेवाईकांनी धर्म विचारूनच गोळ्या घातल्याचे सांगितले होते. तशा बातम्याही प्रसार माध्यमातून समोर आल्या होत्या. असे असतानाही कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांना कुठे धर्म विचारण्याइतपत वेळ असतो, अशी टीका केली आहे. काही लोकांनी असं काहीही घडलं नसल्याचं सांगितल्याचंही ते सांगतात. दहशतवाद्यांची कोणतीही जात किंवा धर्म नसल्याचे सांगत त्यांनी यातील दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारची विधाने करणे म्हणजे मृतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारायला वेळ नसतो, पहलगाम हल्ल्यावर वडेट्टीवार यांचे वादग्रस्त विधान

अशा प्रकारची वक्तवे करून जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. वास्तविक, दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारलं हे त्यांच्या सोबतच्या माणसांनीच सांगितलं, आणि ते सगळ्याच प्रसार माध्यमांनी दाखवलं. तरीही अशाप्रकराची विधाने होत असतील तर त्याला काय म्हणावं हेच मला कळत नाही, असंही फडणवीस म्हणाले. तिथे वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करणे हे अत्यंत वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की आणखी काय हे मला समजत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वडेट्टीवार यांचे हे विधान असंवेदनशील आहे. तिथे ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.



Source link

Comments are closed.