Confusion continues over appointment of private secretaries to ministers five ministers awaiting private secretaries in marathi
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक तसेच विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या मान्यतेने करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय मंत्री कार्यालयात किती अधिकारी, कर्मचारी असावेत याची संख्याही त्यांनी निश्चित केली आहे.
Secretaries To Ministers : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार स्थिरस्थावर होऊन जवळपास सहा महिने होत आले तरी मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्तीचा घोळ अद्याप कायम आहे. शिवसेनेचे चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री अजूनही खासगी सचिवांच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाला हिरवा कंदील मिळत नसल्याने या पाच मंत्र्यांना खासगी सचिवांविना काम करावे लागत आहे. (confusion continues over appointment of private secretaries to ministers five ministers awaiting private secretaries)
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 40 मंत्री आहेत. यापैकी उद्योगमंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या पाच मंत्र्यांकडे सध्या खासगी सचिव नाहीत. संबंधित मंत्र्यांनी खासगी सचिव म्हणून ज्या अधिकाऱ्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे, त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्याप मान्यता दिली नाही. त्यामुळे, उदय सामंत यांनी आपल्या मर्जीतील अधिकारी योगेश महांगडे यांची एमआयडीसीत नियुक्ती दाखवून त्यांना खासगी सचिव म्हणून नेमल्याचे समजते.
हेही वाचा – Neeraj Chopra Created History : दोहा डायमंड लीगमध्ये नीरजने रचला इतिहास; 90 मीटरहून अधिक लांब भाला फेकला
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मंत्र्यांचे खासगी सचिव, स्वीय सहाय्यक तसेच विशेष कार्य अधिकारी यांच्या नियुक्त्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या मान्यतेने करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय मंत्री कार्यालयात किती अधिकारी, कर्मचारी असावेत याची संख्याही त्यांनी निश्चित केली आहे. या आदेशामुळे मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा हिरमोड झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या दबावाला ना जुमानता अनेक मंत्र्यांकडे खासगी सचिव म्हणून नव्या अधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे मंत्र्यांना आपल्या निकटच्या अधिकाऱ्यांना खासगी सचिव म्हणून संधी देता आली नाही. तरीही चार मंत्र्यांकडील अधिकारी हे आज ना उद्या खासगी सचिव म्हणून आपल्या नावाच्या नियुक्तीचा आदेश निघेल, या आशेवर काम करत आहेत.
शंभूराज देसाई यांनी खासगी सचिव म्हणून प्रल्हाद हिरामणी यांच्या नावाचा तर गुलाबराव पाटील यांनी अशोक पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. या दोन अधिकाऱ्यांबाबत स्वतः फडणवीस निर्णय घेणार आहेत. संजय राठोड यांनी खासगी सचिव पदासाठी विशाल राठोड यांची शिफारस केली आहे. मात्र, फडणवीस विशाल राठोड यांच्या नावासाठी फारसे अनुकूल नाहीत. मकरंद पाटील यांनी खासगी सचिव म्हणून कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस केलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्यात चर्चा होऊन खासगी सचिवांच्या नियुक्तीवर तोडगा निघेल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
हेही वाचा – High Court : मंदिरात केवळ ब्राह्मण पुजारीच का असतात… उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
दरम्यान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्याकडे खासगी सचिव म्हणून नियुक्ती मिळालेले मिलिंद कुलकर्णी हे त्यांच्य्या वित्त आणि नियोजन विभागात परत गेले आहेत. त्यामुळे शेलार यांच्याकडे देवीदास कुलकर्णी हे ‘मेडा’ चे अधिकारी खासगी सचिव म्हणून रुजू झाले आहेत.
Comments are closed.