Descendants slam BJP government for excluding Mughal history from NCERT syllabus
एनसीईआरटीने अभ्यासक्रमातून दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याचा इतिहास वगळला आहे. इयत्ता 7वीच्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर, मुघलांचे वशंज प्रिन्स याकूब हनेबुद्दीन यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : एनसीईआरटीने अभ्यासक्रमातून दिल्ली सल्तनत आणि मुघल साम्राज्याचा इतिहास वगळला आहे. इयत्ता 7वीच्या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांनंतर, मुघलांचे वशंज प्रिन्स याकूब हनेबुद्दीन यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर संताप व्यक्त केला आहे. भारताला सर्वाधिक महसूल हा मुघलांनी बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या पर्यटनातून मिळत आहे. यात उत्तर प्रदेशातील ताजमहाल, दिल्लीतील हमायूंचा मकबरा आणि मराठवाड्यातील बीबीचा मकबरा आणि अशाच प्रकारच्या मुघल स्थापत्य आणि शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असलेल्या वास्तूंच्या माध्यमातून महसूल मिळत आहे. तेही सरकारने बंद केले पाहिजे. लाल किल्ला देखील मुघलांची देण आहे, मग तिथे तिरंगा कशाला फडकवता, तेही बंद करा, असा संताप मुघलांचे वंशज प्रिन्स याकूब हनेबुद्दीन यांनी व्यक्त केला आहे. (Descendants slam BJP government for excluding Mughal history from NCERT syllabus)
एनसीईआरटीने सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता 7वीच्या सामाजशास्त्राच्या पुस्तकात बदल केला आहे. या पुस्तकातून मुघलांचा इतिहास आणि त्यांचा कार्यकाळ वगळण्यात आला आहे. त्यासंबंधीचे धडे पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आले आहे. त्याऐवजी प्राचीन राजवंश, पवित्र भुगोल, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांचा समावेश केला आहे.
हेही वाचा – Cabinet Decision : एक रुपयात पीक विमा योजना गुंडाळली, सुधारित पीक विमा योजनेला मान्यता
मुघलांचा इतिहास पाठ्यक्रमातून काढून टाकण्याच्या मुद्यावर मुघलांचे वंशज प्रिन्स याकूब यांनी संतप्त भावाना व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मुघलांचा इतिहास मिटवण्याचे काम भाजपा करत आहे. अभ्यासक्रमातून मुघल बादशहांचे नावे काढू शकता, मात्र मुघल इतिहास मिटवू शकणार नाही, अशी संतप्त भावना व्यक्त केली. मुघलांचा इतिहास तुम्ही पुस्तकातून काढू शकता, मात्र तो जगातून नाही काढू शकत नाही, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाकडे काहीही काम उरलेली नाही, त्यांना फक्त हिंदू-मुस्लिम करायचे आहे. त्यासाठीच त्यांनी हे केले असल्याचा आरोप प्रिन्स याकूब यांनी केला. ते म्हणाले की, ताजमहल, हुमांयूचा मकबरा, लाल किल्ला हा मुघलांचा वारसा आहे. देशाला 30 टक्के महसूल ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मिळतो. मुघलांचा एवढाच राग आणि द्वेष असेल तर यातून मिळणारा महसूल घेऊ नका. तुम्हाला मुघलांचा एवढा तिटकारा असेल तर, लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा ध्वज कशाला फडकवता, कारण ते मुघलांचे निवासस्थान आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मुघलांच्या वंशजाकडून आलेल्या या प्रतिक्रियेवर आता भाजपा नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.