Devendra Fadnavis said that our efforts are to develop Gadchiroli as a steel city
‘महाराष्ट्र उद्योग संवाद, घडवूया उद्याचे भविष्य’ या माध्यमातून “महाराष्ट्र उद्योग संवादाचे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य केले आहे.
मुंबई : ‘महाराष्ट्र उद्योग संवाद, घडवूया उद्याचे भविष्य’ या माध्यमातून “महाराष्ट्र उद्योग संवादाचे” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र उद्योग संवादाचे’ उद्घाटन करण्यात आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे वक्तव्य केले आहे. (Devendra Fadnavis said that our efforts are to develop Gadchiroli as a steel city)
गडचिरोलीचा कसा कायापालट होत आहे, असा प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही सातत्याने गडचिरोलीमध्ये उद्योग वाढावे, याकरता प्रयत्न केले. त्यामुळे आज आपण त्या दिशेने चाललो आहोत. आताच महाराष्ट्राच्या एक तृतीयांश स्टीलची क्षमता गडचिरोलीत होत आहे. पण लवकरच देशाची एक तृतीयांश क्षमता ही महाराष्ट्रात आणि बहुतांश गडचिरोलीत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सर्व करत असताना आमचा प्रयत्न असा असणार आहे की, पर्यावरणाची शाश्वत मूल्य कशी सुरक्षित ठेवता येईल, हे आम्ही पाहत आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Devendra Fadnavis : राजकीय विरोध जे करतील, त्यांना आम्ही…; शक्तिपीठवरून फडणवीसांचा इशारा
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असून गडचिरोलीत 1 कोटी झाडं लावण्याचा आमचा प्लॅन आहे. त्याचबरोबर शाश्वत खाणकाम करण्याचा आमचा प्लॅन आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत की, गॅसची उपलब्धता करून गॅस स्टील इंडस्ट्री गॅस बेस कशा करता येतील, हा आमचा प्रयत्न आहे. तसेच या भागामध्ये अवजड मशिनरी आणि ट्रान्सपोर्टटेशनचे ट्रक्स पर्यायी इंधनावर चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकूणच गडचिरोलीचा विकास करताना जल, जमिन आणि जंगल या तिन्ही गोष्टींचा समतोल राखत आपल्याला कशाप्रकारे विकास करता येईल, असा देखील आमचा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Wadettivar on BJP : राज्य कर्जबाजारी पण चांदीच्या ताटाचा थाट; वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Comments are closed.