Devendra Fadnavis says he will bring reliable seeds to the Sarathi portal to prevent the sale of bogus seeds


आज (21 मे) राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासार्ह बियाणं केंद्र सरकारच्या सारथी पोर्टलवर आणली जाणार असल्याची माहिती दिली.

मुंबई : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊ ठेपला आहे, त्या अनुषंगाने शेती पूर्व मशागतीला देखील वेग आल्याचे चित्र आहे.या हंगामात अधिक उत्पन्न मिळावे यासाठी बळीराजा सर्वतोपरी सज्ज झाला आहे. मात्र दरवर्षी बियाणं अथवा खतांमध्ये फसवणूक होण्याचे प्रकार समोर येतात. याचपार्श्वभूमीवर आज (21 मे) राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासार्ह बियाणं केंद्र सरकारच्या सारथी पोर्टलवर आणली जाणार असल्याची माहिती दिली. (Devendra Fadnavis says he will bring reliable seeds to the Sarathi portal to prevent the sale of bogus seeds)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक – 2025’ चे आयोजन करण्यात आले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात यावेळी आवश्यक तेवढा बियाणांचा आणि खतांचा पुरवठा आहे. यात कुठलाही तुटवडा निर्माण होणार नाही. मात्र वारंवार बोगस बियाणांचे प्रकार बाहेर येतात. त्यामुळे महाराष्ट्राने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे. केंद्र सरकारचे सारथी हे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर बियाण्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. हे रजिस्ट्रेशन स्ट्रेसेबल असतं. त्यामुळे बियाण्याचं उत्पादन कुठं झालं हे आपल्याला पाहता येणार आहे. आम्ही केंद्र सरकारला ट्रुथफूल बियाण्याचीही या पोर्टलवर नोंदणी करावी अशी विनंती केली आहे. ही विनंती आता मान्य करण्यात आली आहे. सध्या ट्रुथफूलचे 70 हजार क्विंटल बियाणं सारथी पोर्टलवर आहे. पुढच्यावर्षी 100 टक्के असेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय, मंत्री बावनकुळेंची घोषणा

महाविस्तार अ‍ॅपमध्ये शेतीची सर्व माहिती उपलब्ध

शेतकऱ्यांना आता लिंकिंगचा सामना करावा लागणार नाही. कारण प्रत्येक कृषी केंद्राच्याबाहेर शेतकऱ्यांसाठी लिंकिंगची व्यवस्थापन करण्यात येईल. तसेच प्रत्येक तालुक्यात डिजीटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जाईल. महाविस्तार अ‍ॅपमध्ये शेतीची सर्व माहिती उपलब्ध आहे. कुठली लागवड करायची? काय वापरलं पाहिजे? याचे सर्व व्हिडीओ पाहायला मिळतील. त्यात एक चॅटबॉट असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. हा चॅटबॉट लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरदेखील आणणार असल्याचे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Monsoon : हवामान खात्याने दिला हा इशारा, या तारखेला महाराष्ट्रात धडकणार मान्सून



Source link

Comments are closed.