Devendra Fadnavis scathing criticism of Sanjay Raut’s book narkatla swarg
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे 17 मे रोज प्रकाशन होणार आहे. पण त्याआधीच या पुस्तकातील बराचसा मजकूर समोर आला आहे. त्यामुळे, प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक चर्चेत आलं आहे. यानंतर संजय राऊत यांच्या पुस्तकावर भाजपाकडून मोठ्या प्रमाणात टिका होत असतानाच आथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे 17 मे रोज प्रकाशन होणार आहे. पण त्याआधीच या पुस्तकातील बराचसा मजकूर समोर आला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकातील “राजा का संदेश साफ है” या प्रकरणात दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कशाप्रकारे मदत केली, याची आठवण लिहिली आहे. राऊतांनी त्यांच्या पुस्तकातून अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून खळबळ उडाली आहे. त्यामुळे, प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक चर्चेत आलं आहे. संजय राऊत यांच्या पुस्तकावर भाजपाकडून मोठ्या प्रमाणात टिका होत असतानाच आथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. (Devendra Fadnavis scathing criticism of Sanjay Raut’s book narkatla swarg)
संजय राऊत यांच्या पुस्तकासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कथा, कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशी खोचक टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकाराने आणखी एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु देवेंद्र फडणवीस संतापले आणि त्यांनी म्हटले की, संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यामुळे त्यांचं सोडून द्या, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – Girish Mahajan On Raut : महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत महाजन राऊतांबद्दल भरभरून बोलले
🕑 1.49pm | 16-5-2025📍Buldhana.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Buldhana https://t.co/Cl54QArqN2
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 16, 2025
पुस्तकाचं नाव नरकातला राऊत ठेवण्याची बावनकुळेंची मागणी
संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, संजय राऊतांनी त्यांच्या पुस्तकाच नाव बद्दलण्याची गरज आहे. संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकाचं नाव ‘नरकातला राऊत’ असं ठेवावं. यासाठी मी त्यांना पत्रही पाठवणार आहे, अशी माहिती देत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात स्वत:च राजकीय अधिपतन कसं असतं याचा लेखाजोखा मांडला आहे. तसेच नैतिक दिवाळखोरीची कहाणी लिहिली आहे. भाजपा सेना युती सर्वोत्तम होती, या युतीला बाळासाहेब ठाकरे यांनी न्याय देण्याचं काम केलं. परंतु संजय राऊतसारख्या व्यक्तीनेच शिवसेना संपवली, हिंदुत्व विचारांशी फारकत घेऊन काँग्रेसचा दावणीला उद्धव ठाकरे यांना बांधण्याच काम त्यांनी केलं, असा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
हेही वाचा – Ravindra Waikar : ईडीचा जाच नको…. अन्यथा आत्महत्या करावी लागेल, वायकरांनी कोणासमोर मांडली कैफियत?
Comments are closed.