Eknath Shinde said that he will teach Pakistan a lesson in the Pahalgam terrorist attack case
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात आज (22 एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट मोडवर आले असून जम्मू-काश्मिरमधील प्रशासनासोबत संपर्कात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे वक्तव्य केले आहे.
मुंबई : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात आज (22 एप्रिल) दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला केला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आतापर्यंत 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील प्रशासन अलर्ट मोडवर आले असून जम्मू-काश्मिरमधील प्रशासनासोबत संपर्कात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकड्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे वक्तव्य केले आहे. (मराठी said that he will teach Pakistan a lesson in the Pahalgam terrorist attack case)
माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना श्रीनगरला पाठवले आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, निरपराध पर्यटकांना मारण्यात कुठली मर्दुमकी आहे. हा भ्याड हल्ला आहे. पाकडे सर्जिकल स्ट्राईकनंतर बिळात लपले होते. त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या पाकड्यांचा बदला घेतला जाईल. अॅक्शनला रिअॅक्शन मिळेल. कारण आपला भारत देश आहे आणि या देशाचे पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री पाकड्यांना सोडणार नाहीत. आजच्या हल्ल्यात ज्यांचा जीव गेला आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे शिंदे म्हणाले.
हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
महाराष्ट्रातील पर्यटक जखमी असण्याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी म्हटले की, मी प्रगती जगदाळे या मुलीशी बोललो आहे. तिने मला सांगितले की, आमच्यासमोर तिच्या वडिलांना आणि काकांना नाव विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्यामुळे जगदाळे कुटुंबीय घाबरले आहे. मी त्यांना सांगितलं की, स्वत: केंद्रीय गृहमंत्री तिथे पोहचत आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील संपर्क सुरू आहे. मी स्वत: लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या एडीसीसोबत आणि लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्यासोबत बोललो आहे. त्यांना महाराष्ट्रातील लोकांबाबत माहिती देण्यात आली आहे. तिथल्या सर्व लोकांना मदत मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील स्वत: संपर्कात आहेत. एक विशेष अधिकारी म्हणून नोडल अधिकाऱ्याची त्याठिकाणी नेमणूक झाली आहे. या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आमचा नंबर दिला आहे.
Comments are closed.