Eknath Shinde stranded in Jalgaon after pilot refuses to fly plane
पालखी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना जळगावहून मुंबईकडे रवाना होण्यास उशीरा झाला आहे. कारण त्यांच्या विमानातील पायलटने विमान उडवण्यास नकार दिला आहे.
जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (06 जून) सायंकाळी जळगाव दौऱ्यावर होते. विमानतळावर आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिला चालक असलेल्या पिंक रिक्षातून विमानतळ ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रिक्षाने प्रवास केला. पालखी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना जळगावहून मुंबईकडे रवाना होण्यास उशीरा झाला आहे. कारण त्यांच्या विमानातील पायलटने विमान उडवण्यास नकार दिला आहे. (मराठी stranded in Jalgaon after pilot refuses to fly plane)
मुक्ताईनगर येथील आपला दौरा आटोपून एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहचले होते. मात्र विमान उडवण्याची वेळ झालेली असताना पायलटने विमान उडवण्यास नकार दिला. कारण पायलटच्या ड्युटीची वेळ संपली होती. तसेच एकनाथ शिंदेंच्या विमानाचा पायलट 12 तासांहून अधिक काळ सलग विमान चालवत असल्याने थकला होता. त्यामुळे त्याची तब्येत देखील बिघडली होती. त्यामुळे तांत्रिक अडचणी आणि प्रकृतीच्या कारणामुळे पायलटने विमान उडवण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचा ताफा विमानतळावरच थांबला होता.
हेही वाचा – Ajit Pawar : लाडक्या बहिणींचा निधी पुन्हा वळवला; अजितदादा म्हणतात, जर कोणाची तक्रार करायची असेल तर…
मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पायलटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मंत्र्यांनी पायलटची समजूत काढल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पायलटसोबत चर्चा केली. त्यानंतर पायलटांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना विमानतळावर बोलवण्यात आले. त्यानंतर पायलट विमान उडवण्यास तयार झाला. मात्र पायलटची ड्युटीची वेळ संपली होती. त्यामुळे पुन्हा परवानगी घेण्यास काही वेळ लागला. अखेर एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
गिरीश महाजन काय म्हणाले?
माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पायलटच्या तब्येतीची अडचण होती आणि त्यातही त्यांच्या वेळेची अडचण होती. या दोन्ही टेक्निकल अडचणी होत्या. आम्ही त्यांच्या कंपनीशी बोललो. त्यानंतर कंपनीने पायलटला त्यांच्या भाषेत समजावलं. अगदी साधी किरकोळ अडचण होती, पण आता एकनाथ शिंदे याचं विमान उडालेलं आहे. एका तासात एकनाथ शिंदे मुंबईला पोहोचतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
Comments are closed.