Financial assistance of Rs 50 lakhs announced for families of those killed in Pahalgam terror attack in Maharashtra


पहलगाम हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यानंतर आज (29 एप्रिल) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणखी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

मुंबई : दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. यानंतर आज (29 एप्रिल) मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आणखी आर्थिक मदत जाहीर केली आहे. (Financial assistance of Rs 50 lakhs announced for families of those killed in Pahalgam terror attack in Maharashtra)

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीच्या अतुल मोने, हेमंत जोशी, संजय लेले या तिघांचा आणि पनवेलच्या दिलीप देसले यांचा त्याचदिवशी मृत्यू झाला होता. तर पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हे दोघे दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना आणि दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यानंतर आता मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबांच्या शिक्षण व रोजगाराच्या गरजांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा – Nashik Politics: पालकमंत्री पदावर शिक्कामोर्तब ? नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या उपस्थितीत ध्वजवंदन

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे. याच अनुषंगाने, जगदाळे कुटुंबातील एका मुलीला सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव मागील चर्चेत ठरला होता. मात्र, आता मुख्यमंत्री विशेषाधिकाराचा वापर करत जगदाळे कुटुंबातील मुलीला तत्काळ सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – India Vs Pakistan : …तेव्हा ‘भाजपा’ परिवार मुंबईत धावला, उद्धव ठाकरेंनी करून दिले स्मरण



Source link

Comments are closed.