Girish Mahajan hits back after Eknath Khadse criticizes Sudhakar Badgujar’s entry into BJP
सुधाकर बजगुजर यांनी आठवड्याभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर विरोधक भाजपावर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपावर टीका केली असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण गिरीश महाजन यांच्या पुढाकारमुळेच सुधाकर बजगुजर भाजपात आले आहेत. यानंतर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला आहे.
सोलापूर : भाजपा आमदार तसेच मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी साधारणपणे दीड वर्षांपूर्वी सुधाकर बडगुजर यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप थेट विधानसभेत केला होता. मात्र सुधाकर बजगुजर यांनी आठवड्याभरापूर्वीच भाजपात प्रवेश केला. त्यानंतर विरोधक भाजपावर टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपावर टीका केली असून त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. कारण गिरीश महाजन यांच्या पुढाकारमुळेच सुधाकर बजगुजर भाजपात आले आहेत. यानंतर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. (Girish Mahajan hits back after Eknath Khadse criticizes Sudhakar Badgujar’s entry into BJP)
एकनाथ खडसे विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले होते. त्यामुळे माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका केली. एकनाथ खडसे म्हणाले की, पूर्वीची भाजपा ही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त अशा चौकटीतील होती. अगदी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर तातडीने माझ्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला होता. मात्र, आता जेलमध्ये जाऊन आलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेले लोक भाजपात प्रवेश करत आहेत. अगदी दाऊदचा हस्तक असलेला आणि सलीम कुत्तासोबत नाचणाऱ्या सुधाकर बडगुजर यांना देखील भाजपामध्ये घेतले गेले आहे. भाजपामध्ये आज 90 टक्के लोक हे बाहेरचे असून त्यांच्यावर विविध आरोप झालेले आहेत. ज्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात मी विरोधी पक्ष नेता असताना टीका केली होती, तेही आज भाजपात आहेत. तसेच 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, तेही आज भाजपासोबत, असे म्हणत खडसे यांनी हल्लाबोल केला.
हेही वाचा – Nitesh Rane : मी मुख्यमंत्री होण्याची वाट पाहू नका; फडणीसांचे नाव घेत काय म्हणाले नितेश राणे?
भाजपच्या या अवस्थेला राज्याचे नेतृत्व जबाबदार आहेत का? असा प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते यास जबाबदार आहे. कारण मी भाजपामध्ये असताना गिरीश महाजन सामान्य कार्यकर्ता होते आणि मी मंत्री असताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान नव्हते. परंतु मी भाजपा सोडल्यानंतर कार्यकर्ता असणारे गिरीश महाजन मंत्री झाले, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.
गिरीश महाजनांचा पलटवार
एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले की, सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश घेतल्यावर एकनाथ खडसे जे काही म्हणाले, त्यापेक्षा मी वाईट नाही. खरं तर एकनाथ खडसे यांना खंत आहे की, त्यांना का घेत नाहीत. पक्षात येण्यासाठी एकनाथ खडसे किती उत्सुक आहेत, हे यावरून दिसतं, असा टोला महाजन यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की, मी लहान कार्यकर्ता आहे, परंतु एकनाथ खडसे यांचे दिल्लीत कनेक्शन आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीही टिप्पणी करणार नाही, कारण ते राष्ट्रीय नेते आहेत. परंतु दिल्लीत त्यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकल्याचे सांगितले होते. त्याचे फोटो अद्यापही समोर आलेले नाहीत, अशी मिश्कील टिप्पणीही गिरीश महाजन यांनी केली.
हेही वाचा – Politics : शरद पवार गटाच्या नेत्याने दिली ‘घड्याळा’ची जाहिरात, शिंदे-अजिदादांचा फोटो वापरला; काय आहे प्रकरण?
Comments are closed.