Local Bandhan organizes Udyog Mantra Ek Yashcha Yasav on June 17


भारतातील पहिले स्थानिक अ‍ॅप असलेल्या लोकल बंधन तर्फे उद्योगमंत्र 2025, एक यशाचा प्रवास हा महासन्मान व परिसंवाद सोहळा 17 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजता, वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित केला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तज्ज्ञ व उद्योजकांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच तज्त्र मंडळींकडून उपस्थितांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. दोन सत्रात हा कार्यक्रम होणार आहे. (Local Bandhan organizes Udyog Mantra Ek Yashcha Yasav on June 17)

याप्रसंगी पद्मश्री प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि रघुनाथ नेत्रालयाचे संस्थापक, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना आरोग्य व सामाजिक योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून विजय कलंत्री – अध्यक्ष, AIAI; अध्यक्ष, वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई, प्रसाद लाड, आमदार आणि प्रवर्तक, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., डॉ. सतीश वाघ – संस्थापक आणि एमडी, सुप्रिया लाइफसायन्सेस लि., सुप्रिया बडवे – कार्यकारी संचालक, बेलराईज इंडस्ट्रीज लि., आर्किटेक्ट संदीप शिक्रे – संस्थापक, SSA आर्किटेक्ट्स., पी. एन. शेट्टी – संस्थापक आणि सीईओ, रुपी बॉस. हिमांशू पाटील – संचालक, केसरी टूर्स प्रा. लि. उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डिजिटल क्षेत्रातील दिग्गज सोशल मीडिया स्टोरीटेलर्स, लेखक, संपादक आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचा सहभाग असेल. तर दुसऱ्या सत्रात डॉ. आशुतोष जावडेकर, सुयोग रिसबुड, मधुराणी गोखले, कविता जोशी लाखे, समीर चौगुले यांचा सहभाग असणार आहे. तसेच यावेळी नव उद्योगजकांना संधी दिली जाणार आहे. यात निवड झालेल्या 10 उद्योजकांना आपल्या प्रवासाबद्दल 2 मिनिटांत सादरीकरण करण्याची संधी दिली जाईल, ज्यातून 3 विजेते घोषित केले जातील. तरी उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहीतीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन लोकल बंधनचे मेंटॉर, संचालक आणि संस्थापक सागर पगार यांच्यातर्फे करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी

स्वाती साळवी – 9833903785
वैभवी यादव – 9833579685



Source link

Comments are closed.