Maharashtra hsc result 2025 on 5th may 2025 know how to check online
बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. तशी महत्त्वाची घोषणा राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
मुंबई: दहावी-बारावीची परीक्षा शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान घेण्यात आली होती. आता या परीक्षांचे निकाल कधी लागणार याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. हे निकाल लवकरच लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. तशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बारावीचा निकाल 5 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. तशी महत्त्वाची घोषणा राज्य शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. (Maharashtra hsc result 2025 on 5th may 2025 know how to check online PuP)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांबाबत बोलताना, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी दहावीच्या परीक्षांच्या निकालांचं कामकाज अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे 15 मेपर्यंत दहावीचा निकाल लागेल असं सांगितलं जातं आहे.
कधी जाहीर होणा निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळणाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख घोषित केली आहे. उद्या दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. या परीक्षेला 15 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे सर्वच विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
बारावीचा निकाल कुठे पाहू शकता?
बारावीचा निकाल हे तीन वेबसाईट्सवर पाहता येईल
mahahsscboard.in
maharesult.nic.in
hscresult.mkcl.org
निकाल कसा पाहाल?
– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक दिसेल.
-त्या लिंकवर क्लिक करा.
– एक नवीन पेज ओपन होईल, त्यात तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
-नंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
– तुम्हाला निकाल लगेच दिसेल. त्याचं प्रिंटआऊट काढू शकता किंवा डाऊनलोडसुद्धा करु शकता.
(हेही वाचा : NCP : पवारांसह ठाकरे आणि चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला यायला नकार, तर शिंदेंची दांडी; अजितदादांनी सुनावले )
Comments are closed.