Maharashtra Weather Rain warning in this district including Mumbai big crisis for farmers


मुंबई : राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. सोमवारी (ता. 5 मे) अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. पण आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला आधीच अवकाळीने झोडपले असताना आता या भागातील जिल्ह्यांना गारपीटीचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कारण विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. (Maharashtra Weather Rain warning in this district including Mumbai big crisis for farmers)

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही भागात अवकाळी पावसासोबत गारपिटीची देखील शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना मात्र काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत 6 आणि 7 तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात अवकाळीच्या पावसासोबतच गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये 6 व 7 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हेही वाचा… Thane : पावसाळ्यासाठी सज्ज व्हा – आयुक्त सौरभ राव

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, कोकण-गोवा या विभागांमध्ये आज आणि उद्या पावसाचा अलर्ट आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, या जिल्ह्यांमध्ये आज मंगळवारी (ता. 7 मे) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्याच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे. विदर्भात काही ठिकाणी 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.



Source link

Comments are closed.