MBBS student dies by suicide at AFMC Pune mentioned education minister in note
पुणे : भोपाळ येथील एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीडमधील 18 वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याने व्हॉटसअॅप मेसेद्वारे आई-वडिलांना सुसाईट नोट पाठवली, तसेच स्वतःच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेऊ या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. यावेळी त्याने स्वतः चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली. वानवडीतील लष्कराच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात (एएफएमसी) ही घटना घडली असून पोलीस याबाबत अद्याप तपास करत आहेत. (MBBS student dies by suicide at AFMC Pune mentioned education minister in note)
हेही वाचा : Sanjay Raut : त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नये, राज ठाकरेंसोबतच्या युतीवर राऊतांची स्पष्ट भूमिका
18 वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो अभ्यासात हुशार होता. मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्षने अभ्यासाच्या तणावाला कंटाळून स्वतःचा गळा कापत पुण्यात आत्महत्या केली. उत्कर्ष हा काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असून तो उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. पुण्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या क्रीडा महोत्सवाला आलेले असताना त्याने राहत असलेल्या घरात सुरीने आपला गळा कापला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने ऑनलाईन ही सुरी मागवली होती. त्याने आत्महत्या करण्याआधी व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट लिहली होती. याप्रकरणी वानवडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
उत्कर्ष हा भोपाळमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (AIIMS) वैद्यकीय शिक्षण घेत होता. तो ८ मे रोजी पुण्यातील एएफएमसी मैदानावर आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. सोमवारी (12 मे) पहाटे उत्कर्षने वसतिगृहाच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधीच्या भोपाळला परतण्यासाठी त्याने आपल्या मित्रांना तिकीट बुक करून द्यायला सांगितले होते. पण 12 मे रोजी त्याने असे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बाथरूममध्ये उत्कर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, अशी माहिती वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी दिली. उत्कर्ष अभ्यासात हुशार होत, त्याला नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण मिळाले होते. त्याने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, “मी उत्कर्ष शिंगणे, भोपाळमधील एम्सचा विद्यार्थी आहे. शैक्षणिक ताण आणि नैराश्यामुळे मी स्वतःचा जीवन संपवत आहे. मी शिक्षणमंत्र्यांना विनंती करतो की अभ्यासक्रमातून मुघल, फ्रेंच आणि रशियन इतिहास काढून टाकावा आणि त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे चरित्र समाविष्ट करावे,” अशी मागणी त्याने केली आहे.
Comments are closed.