Ppp model for msrtc lands minister pratap sarnaik suggests boosting revenue in marathi
MSRTC : मुंबई : शहरामध्ये परिवहन महामंडळाची बसस्थानके, बस आगार परिसरात जागा आहेत. अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करू शकते. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा. यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यात यावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिल्या. (ppp model for msrtc lands minister pratap sarnaik suggests boosting revenue)
एस.टी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातील सभागृहात महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस महामंडळाचे महाव्यवस्थापक (स्थापत्य) दिनेश महाजन, वास्तुविषारद लहीवाल आदी उपस्थित होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन महामंडळाच्या जागांचा पीपीपी पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा – Supreme Court : भाडेकरू – घरमालकांमधील वाद प्रलंबित राहणे म्हणजे… काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय
राज्यातील एसटीच्या जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्याचे सांगत परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले, या जागांच्या विकासासाठी अ, ब व क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावे. याच शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा. पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावे. राज्यातील 72 पॅकेजेसमधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे. पॅकेजमध्ये कामाबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात. या कामाला गती देऊन तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
हेही वाचा – Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर येत्या रविवारी मेगाब्लॉक; मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचेही डायव्हर्जन
Comments are closed.