Pune Municipal Commissioner slams BJP office bearer Omkar Kadam for harassing female officer
पुणे : महापालिकेतील आरोग्य विभागात असलेल्या महिलेला त्रास देणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला आयुक्त नवलकिशोर राम यांनी दणका दिला आहे. भाजप पदाधिकारी आणि त्याच्या साथीदारांना महापालिका भवन आणि आवारात प्रवेशास बंदी घातली आहे. प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष ओंकार कदम आणि त्यांच्या साथीदारांनी 17 फेब्रुवारीला महापालिकेत आरोग्य विभागात येऊन महिला अधिकाऱ्याला दमदाटी करत चित्रीकरण केले होते. तसेच, कार्यालयाबाहेर जाण्यास महिला अधिकाऱ्याला मज्जाव केला होता. (Pune Municipal Commissioner slams BJP office bearer Omkar Kadam for harassing female officer)
हेही वाचा : मराठी : किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या लाडक्या बहिणीसाठी धावून आले उपमुख्यमंत्री शिंदे, नेमकं काय घडलं?
या घटनेनंतर महिला अधिकाऱ्याने सुरक्षा समितीसह भाजपच्या नेत्यांकडे कदम यांची तक्रार केली होती. तसेच, महापालिकेच्या अंतर्गत समितीकडे सुद्धा कदम यांची तक्रार करण्यात आली होती. पण, त्यानंतरही कदम यांनी त्रास देणे सुरु ठेवल्याने महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. कदम यांच्याविरोधात मनपा सुरक्षा विभागाने पोलीस ठाण्यात अर्ज दाखल केला आहे. त्यासह अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रार केली होती, याचा अहवालही मनपा आयुक्तांकडे देण्यात आला आहे. महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर ओंकार कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
महिला अधिकाऱ्याने करोडोंचा भ्रष्टाचार केला – कदमांचा आरोप
करोडोंचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस होऊ नये म्हणून हा आकाडतांडव केला आहे. महिला आयोगाने याप्रकरणाची दखल घ्यावी. खोटे आरोप करण्यात येत असल्यास महिला अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार कायद्याअंतर्गत कारवाई करावी. महिला अधिकाऱ्याने संगनमताने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. महिला अधिकाऱ्याने करोडोंची खोटी बिले काढली आहेत, असा आरोप कदम यांनी केला आहे.
कदम आणि अन्य साथीदारांना प्रवेशबंदी
महिला अधिकार्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. कर्मचार्यांवर मानसिक दबाव आणण्याचे प्रकार गंभीर असून त्यामुळे कठोर पावले उचलणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.