Restrictions imposed at Satara Tourist Spots Till August 19
सातारा : महाराष्ट्राला सह्याद्री पर्वत रांगामुळे एक विशेष सौंदर्य प्राप्त झालेले आहे. पावसाला सुरु झाला की याच नैसर्गिक सौदर्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातील लाखो पर्यटक महाराष्ट्रात खासकरून सातारा जिल्ह्यात येत असतात. सातारा जिल्ह्यातील कास पठार, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी फिरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे लाखो पर्यटकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. (Restrictions imposed at Satara Tourist Spots Till August 19)
हेही वाचा : CM Fadnavis : बोलबच्चनांना…; ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचे एका वाक्यात प्रत्युत्तर
गेल्या काही दिवसांपासून घाटमाथ्यावर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटनांचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. 20 जूनपासून ते 19 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर दरडी कोसळण्याचा, पाण्याचा प्रवाह वाढण्याचा आणि अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी लागू केली आहे.
ही पर्यटनस्थळे राहणार बंद
> अजिंक्यतारा किल्ला
> ठोसेघर धबधबा
> केळवली-सांडवली धबधबा
> वजराई धबधबा
> कास पुष्प पठार
> एकीव धबधबा
> कास तलाव
> बामणोली
> पंचकुंड धबधबा
> सडावाघापूर उलटा धबधबा
> ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा
> रुद्रेश्वर देवालय धबधबा
> ओझर्डे धबधबा
> घाटमाथा धबधबा
> लिंगमळा धबधबा
इतर पर्यटनस्थळांवर हे निर्बंध
> पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे यावर बंदी
> धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे याला बंदी
> पावसामुळे धोकादायक ठिकाणी धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी आणि चित्रीकरण करण्याला बंदी
> धबधब्यांच्या परिसरात मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे याला परवानगी नाही.
> वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवता येणार नाही.
> सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेडछाड, असभ्य वर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई
> सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा, डीजे वाजविणे यावर बंदी
Comments are closed.