Rohit Pawar makes serious allegations against the police in the Nerul drugs case
लिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच काही ना काही वादग्रस्त विधान करत असतात. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना अकार्यक्षम म्हणत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला होता. विरोधकांनी याप्रकरणी टीका केल्यानंतरही संजय गायकवाड आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. (Rohit Pawar makes serious allegations against the police in the Nerul drugs case)
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले की, आमदार संजय गायकवाड जे म्हणाले आहेत ते खोटं आहे, असं अजिबात नाही. संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, पोलिसांना 50 लाखांचा माल सापडला, तर ते दाखवताना कमी दाखवतात आणि वरचे पैसे घेतात. संजय गायकवाड यांना ही गोष्ट माहिती आल्याशिवाय ते असा आरोप करणार नाहीत. त्यामुळे माझी मागणी आहे की, संजय गायकवाड यांनी ज्या पोलिसांवर आरोप केले आहेत, त्यांना शोधून काढा. तसेच देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, नेरुळ ड्रग्ज प्रकरणात एफआयर दाखल झाला आहे. त्याप्रकरणी त्यांनी बोलावे. कारण नेरुळ ड्रग्ज प्रकरणात पोलीस प्रशासनातील लोकं सहभागी आहेत. 1100 ते 1200 कोटी रुपयांचा ड्रग्जचा व्यवहार आहे. परंतु प्रत्यक्षात वेगळी रक्कम दाखवली आहे. पोलीस प्रशासन यामध्ये सहभागी आहेत, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
हेही वाचा – Sushma Andhare on Rane : चवली–पावलीच्या नेत्यांना ही चपराक, सुषमा अंधारेंच्या निशाण्यावर नितेश राणे
संजय गायकवाड आपल्या वक्तव्यावर ठाम
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे पोलिसांबद्दल केलेल्या आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. त्यांनी म्हटले की, मी पोलिसांबाबत जे वक्तव्य केलं आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, माझ्या व्यक्तिगत अनुभवावरून मी ते वक्तव्य केलं आहे आणि मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर चर्चा केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहितीही संजय गायकवाड यांनी दिली आहे.
Comments are closed.