Sanjay Raut alleges that Aghori Puja is being performed by the Shinde group to eliminate CM Devendra Fadnavis


शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 19 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडीओबाबत मत व्यक्त केले आहे. त्यांनी यावेळी एलिमिनेट या शब्दाचा वापर करत हे सर्व काही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पायउतार करण्यासाठी सुरू असल्याचा दावा केला आहे.

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार, तथा राज्याचे मंत्री भरत गोगावले हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी गोगावले यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत गोगावले एक पूजा करत असल्याचे पाहायला मिळाले. पण ती पूजा कोणती तरी अघोरी पूजा असल्याची चर्चा नंतर सुरू झाली. पण त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सुद्धा गोगावले यांच्या घरातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक काळे कपडे घातलेला बाबा आणि दोन साधू दिसून येत आहेत. याच व्हिडीओवरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून फडणवीसांना एलिमिनेट करण्यासाठी ही अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. (Sanjay Raut alleges that Aghori Puja is being performed by the Shinde group to eliminate CM Devendra Fadnavis)

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (ता. 19 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादीकडून व्हायरल करण्यात आलेल्या व्हिडीओबाबत मत व्यक्त केले आहे. त्यांनी यावेळी एलिमिनेट या शब्दाचा वापर करत हे सर्व काही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावरून पायउतार करण्यासाठी सुरू असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फडणवीसांनी कॅबिनेटच्या बैठकीला बसण्याआधी खुर्चीखाली वाकून पाहावे, कारण काहीही होऊ शकते, असा टोलाच राऊतांनी लगावला आहे. परंतु, शिंदे गटाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आलेली पूजा ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला आहे. त्यामुळे या या लढ्याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. त्याशिवाय महाराष्ट्राने धर्मांतराविरुद्ध लढा दिला आहे. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे पीए तपासून घेत आहेत, त्याप्रमाणे त्यांनी मंत्री सुद्धा तपासून घेतले पाहिजे. कारण अघोरी विद्येत मग्न असलेले मंत्री महाराष्ट्राचे काय भले करणार? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा… Bharat Gogawale : त्या आरोपांवर भरत गोगोवले म्हणाले, हे सर्व पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यासाठी

तसेच, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी एसंशिं गटाचे लोक ठिकठिकाणी अघोरी विद्या करत आहेत, असा दावा यावेळी खासदार राऊतांनी केला आहे. माझा अघोरी विद्येवर विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळूही नाही. पण याचे व्हिडीओ, छायाचित्र समोर येत असून यावरून कोणत्या मानसिकतेच राज्याचे मंत्रिमंडळ आहे हे दिसते. महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणाशी, प्रश्नाशी, लोकशाहीशी, विचारांशी यांना काही पडलेले नाही. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला ‘एलिमिनेट’ करून त्या जागी आपला नेता बसावा यासाठी अघोरी विद्या सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.

तर, मी वारंवार एलिमिनेट हा इंग्रजी शब्द वापरत आहे. कारण इस्रायल-इराण युद्धात हा शब्द वापरला गेला आहे. इस्रायलने इराणच्या काही प्रमुख नेत्यांना विविध माध्यमातून एलिमिनेट केले. इराणचे जनरल, डिफेन्स सेक्रेटरी यात आहेत. तसेच शिंदे गटाच्या लोकांना, मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भाजपाच्या प्रमुख नेत्यांना एलिमिनेट करायचे आहे. मी वारंवार या विषयी बोललो आहे आणि जो प्रकार समोर आला, व्हिडीओ समोर आले हे त्यासाठीच होते. हे वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे. साताऱ्यापासून महाडपर्यंत आणि महाडपासून सावंतवाडीपर्यंत माझ्याकडे प्रत्येक गोष्टींचा छायाचित्रण आहेत, असा दावाही राऊत यांनी केला.



Source link

Comments are closed.