Sanjay Raut criticizes CM Devendra Fadnavis as a fake Chanakya after Chhagan Bhujbal take minister oath
छगन भुजबळांनी मंत्रिदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असून त्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते, आमदार छगन भुजबळ यांनी आज मंगळवारी (ता. 20 मे) मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतील राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिक, येवला येथील समर्थकांनी जल्लोष केला. परंतु, भुजबळांनी मंत्रिदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले असून त्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तर भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांच्यावर सुद्धा राऊतांनी निशाणा साधला आहे. (Sanjay Raut criticizes CM Devendra Fadnavis as a fake Chanakya after Chhagan Bhujbal take minister oath)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी X या सोशल मीडिया साइटवर छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केली आहे. राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “छगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. यामुळे संपूर्ण भाजपा, महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली.” असे म्हणत राऊतांनी टोला लगावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी आपल्या पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नकली चाणक्य असे म्हटले आहे.
हेही वाचा… Laxman Hake On Chhagan Bhujbal : यह तो झाँकी है…, भुजबळांनी शपथ घेताच लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा
त्यांनी आपल्या पोस्टमधून भाजपा नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. “मुलुंडचा पोपटलाल तर बेवा झाला! ढोंगी आणि बकवास लेकाचे!” असेही राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. राऊतांनी केलेल्या या टीकेला आता भाजपा नेतेमंडळींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये नेटकऱ्यांनी सुद्धा कमेंट करत मुख्यमंत्री फडणवीसांच्या या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरने फडणवीसांनी याआधी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांच्या रोषाचाही महायुती सरकारला सामना करावा लागू शकतो, असे दिसून येत आहे.
श्रीछगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होतो आहे.
या मुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली.
मुलुंड चा नागडा पोपटलाल तर बेवा झाला!
ढोंगी आणि बकवास लेकाचे!
@Dev_Fadnavis
@narendramodi pic.twitter.com/vIw17JHuuJ— Sanjay Raut (@rautsanjay61) May 20, 2025
Comments are closed.