Sanjay raut on cm devendra fadnavis ajit pawar eknath shinde mumbai news in marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासह शिंदे-पवारांवर निशाणा साधला. त्यानुसार, “एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे महाराषट्राला आलेलं टेंगूळ आहेत. एक टेकाडा आणि दोन टेंगूळ आहेत, म्हणजेच काय तर मुख्यमंत्री टेकडंय आणि दोन उपमुख्यमंत्री हे टेंगूळ आहेत, हे सह्याद्रीची तुलना स्वत:सोबत करत आहेत, हे हास्यास्पद आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई : प्रगतीचा पाढा वाचणं आणि प्रगती पुस्तकावर शेरा असणं यामध्ये फरक आहे. पाढे वाचायला काय झालंय त्यांना, महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्राचा खणखणीत आणि कणखर असा बाणा होता. दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र मागील तीन वर्षात निर्माण झाला. दिल्लात हिमालय आणि महाराष्ट्रात सह्याद्री उरलं आहे का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना ठाकर गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. (sanjay raut on cm devendra fadnavis ajit pawar eknath shinde mumbai news in marathi)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासह शिंदे-पवारांवर निशाणा साधला. त्यानुसार, “एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे महाराषट्राला आलेलं टेंगूळ आहेत. एक टेकाडा आणि दोन टेंगूळ आहेत, म्हणजेच काय तर मुख्यमंत्री टेकडंय आणि दोन उपमुख्यमंत्री हे टेंगूळ आहेत, हे सह्याद्रीची तुलना स्वत:सोबत करत आहेत, हे हास्यास्पद आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

“महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक जण होती. ज्यांना आम्ही सह्याद्री म्हणून हिमालयाच्या मदतीला पाठवलं. त्याच्याशी तुमची तुलना होऊ शकते का? हे तीन जण टेंगूळ आहेत आणि टेंगूळचं राहणार”, असं म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यासह शिंदे-पवारांवर निशाणा साधला.

“अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही 100 दिवसांचा कायक्रम जाहीर केला असून त्या कार्यक्रमात काय आहे, ते मला माहीत आहे. पण या काळात महाराष्ट्र अत्यंत कमजोर झाला आहे. याबाबत सरकराने श्वेतपत्रिका काढावी. आपापसाताली वादांमुळे महाराष्ट्र कमजोर झाला आहे. 106 हुतात्मांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही. कारण 106 हुतात्मांच्या स्वप्नातील महाराष्ट्र या सरकारने 3 वर्षांत संपवला. हा महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणारा आणि व्यापारांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण करण्यात आला आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

हेही वाचा – Sanjay Raut : सरकार मोदींचं आणि सिस्टम राहुल गांधींची; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Source link

Comments are closed.