Sanjay Raut reply to Devendra Fadnavis criticism of Uddhav Thackeray
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 21 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्या टीकेला उत्तर देताना ते स्वतः ज्युनिअर बोलबच्चन असल्याचा टोला लगावला आहे.
मुंबई : जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचे नाव पुसून टाकणार आहोत. भाजपeचे नामोनिशाण पुसून टाकू, असा इशारा गुरुवारी (ता. 19 जून) शिवसेना ठाकरे गटातून वर्धापन दिन सोहळ्यातून दिला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलेल्या या इशाऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. “बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही.” असे ते म्हणाले. पण त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत, असा टोला राऊतांनी लगावला आहे. (Sanjay Raut reply to Devendra Fadnavis criticism of Uddhav Thackeray)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (ता. 21 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारणा करण्यात आली. त्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले की, आम्हाला जर फडणवीस बोलबच्चन म्हणत असतील, तर ती मोदींकडून प्रेरणा घेतली आहे. ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. जगाच्या बोलबच्चन करणाऱ्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांचे ते अध्यक्ष आहेत. पूर्वी आमचे त्यांच्याशी संबंध होते, त्यामुळे काही गुण आले असतील. मोदी बोलबच्चन असले तरी ट्रम्प यांनी भारत पाक युद्धबंदी आम्ही केली असे 18व्यांदा म्हणूनही त्यांच्या वक्तव्यांवर अजूनही मोदींची दातखिळी बसली असल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी केली.
तसेच, फडणवीस स्वत: ज्युनिअर बोलबच्चन आहेत. त्यांना अजून ते जमत नाही ते उघडे पडतात. मात्र मोदी दररोज उघडे पडत आहेत. लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत, असा हल्लाबोल राऊतांनी केला. तर, मराठी अस्मितेच्या खपली काढण्यासाठी अमित शहा येथे येतात आणि बोलतात. मराठी एकजुटीचा आणि मराठी माणसाचा अपमान अमित शाह यांनी केला. एकनाथ शिंदे हे लिंबू मिरची उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या गटाने स्पष्ट केले आहे की आम्ही अमित शहांचे बूटचाटे आहोत. एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहा यांच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावला.
Comments are closed.