Sharad Pawar’s reaction on Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together


टाळी-प्रतिटाळीनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना दोघांमधील वाद बाजूला ठेवण्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील वाद बाजूला ठेवायला तयार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. या टाळी-प्रतिटाळीनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चांना प्रचंड उधाण आले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Sharad Pawar’s reaction on Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together)

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले आहे. आज अक्षय्य तृतीयेचा मृहूर्त साधत या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला शरद पवार आणि त्यांची पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही. दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यामुळे मला त्याची माहिती नाही आणि मी काही त्यांच्याशी बोललेलो नाही. मग त्याविषयी कसे भाष्य करू, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

हेही वाचा – New Mumbai CP : देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर आज निवृत्त

धर्म, जात-पात आणि भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत

पहलगाम हल्ल्यासंबंधी प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, पहलगामवरचा हल्ला हा देशावरचा हल्ला आहे. या हल्ल्यात ज्यांचे कुटुंबीय शहीद झाले आहेत, त्यांनी या देशासाठी किंमत दिलीय. त्यामुळे आता
धर्म, जात-पात आणि भाषा या गोष्टी कोणीही आणायच्या नाहीत. आज भारतीयांवर कुठल्या शक्तींचा हल्ला होत असेल, तर देशवासिय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी याबाबत जी काही उपाययोजना करत असतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – Raut Vs Mahayuti : …तर, भ्रष्टाचाराला फडणवीसांचे अभय असे मानू, विखे पाटील प्रकरणावरून राऊतांचा निशाणा



Source link

Comments are closed.