Shivsena ubt leader sushma andhare asks question to mahayuti govt over bungalow allocation in marathi


राज्य सरकारने अधिसूचना काढून धनंजय मुंडेंना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

Sushma Andhare : मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये घडत असलेल्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वगळलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आलं आहे. अन्न नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी शुक्रवारी पदभार घेतल्यानंतर आता सध्या धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेला सातपुडा बंगला देखील भुजबळांना देण्यात आला आहे. राज्य सरकारने अधिसूचना काढून धनंजय मुंडेंना 15 दिवसांत बंगला खाली करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. (shivsena ubt leader sushma andhare asks question to mahayuti govt over bungalow allocation)

सातपुडा बंगला भुजबळांना देण्यासंदर्भातील अधिसूचना आल्यानंतर शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. मुंडेंनी राजीनामा देऊन दोन महिने झाले तरी अजूनही हा बंगला मुंडेंच्याच ताब्यात आहे. या महिना अखेरीस मुंडे बंगला खाली करणार आहेत. त्यापूर्वीच सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे. यानंतर अंधारे यांनी ही पोस्ट केली आहे.

हेही वाचा – Rohini Khadse : …तर कदाचित महिला आयोगाचे काम सुरळीत चालेल, रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

‘खुर्चीचा खेळ’ असे म्हणत अंधारे यांनी एक कविताच या पोस्टमध्ये टाकली आहे. त्या म्हणतात,

कशाला देता उगाच दुसऱ्यांना ब्लेम,
जिथे भल्या भल्यांचे चुकतात नेम
तिथे कधीही होईल तुमचा गेम

लाल दिव्यानंतर बंगला
हे मंत्र्यांचे असणारच aim

भुजबळ काय मुंडे काय
सातपुड्यासाठी सगळेच सेम

खरं सांगा दादा –भाऊ
नक्की कुणी कुणाचा केलाय गेम?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (20 मे) राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेलं मंत्रीपद भुजबळ यांना स्थान देण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आलं आहे. तिसऱ्यांदा भुजबळ यांच्याकडे या खात्याची सूत्र आली आहेत.



Source link

Comments are closed.