Shivsena UBT Samana criticized Eknath Shinde on Chhagan Bhujbal entered in maharashtra Cabinet
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारत स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी (20 मे) मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मुखपत्र आसलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना लाज कशी वाटत नाही? असे सवाल उद्धव ठाकरेंना विचारणारे एकनाथ शिंदे आता आता भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. (Shivsena UBT Samana criticized मराठी on Chhagan Bhujbal entered in maharashtra Cabinet)
हेही वाचा : Sanjay Raut on Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचा नकली चाणक्य, भुजबळांना मंत्री करताच राऊतांचा टोला
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत? लाज कशी वाटत नाही? वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे. त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हैदोस घातला पाहिजे.” असा टोला या अग्रलेखातून लगावला आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतले, त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागणार आहे. शिंदेंनी शिवसेना सोडून अमित शहांचे नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारणे दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसणे जमणार नाही हे मुख्य कारण होते.” असे म्हणत टीका केली आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अटक करणाऱ्यांच्या वाऱ्यालाही उभे राहणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. आता एकनाथ शिंदेंची अशी कोंडी अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे की, शिवसेनाप्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या.” असे आव्हान शिवसेना उबाठाने एकनाथ शिंदेंना केले आहे. “छगन भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याला एकनाथ शिंदे आणि गटाने हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या मांडीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला. छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात प्रवेश हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना इशारा आहे.” असे म्हणत सूचक विधान केले आहे.
Comments are closed.