Sudhakar Badgujar warns Uddhav Thackeray in the wake of the upcoming Nashik Municipal Corporation elections


काही दिवसांपूर्वी सुधाकर बजगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने सुधाकर बजगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यापार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला इशारा दिला आहे.

मुंबई : नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी आज (17 जून) आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी बोलताना सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटाला इशारा दिला आहे. कारण काही दिवसांपूर्वी सुधाकर बजगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने सुधाकर बजगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. यापार्श्वभूमीवर सुधाकर बडगुजर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला इशारा दिला आहे. (Sudhakar Badgujar warns Uddhav Thackeray in the wake of the upcoming Nashik Municipal Corporation elections)

सुधाकर बडगुजर म्हणाले की, आज माझा भाजपात आदराने प्रवेश झाला. त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. गिरीश महाजन संकटमोचक आहेत. आपत्ती आली की ते मार्ग काढतात आणि त्यांनी माझा मार्ग काढला. त्यांनी आपल्या सर्वांपर्यंत आणि पक्षापर्यंत माझ्याबाबत काय माहिती दिली, हे माहिती नाही. मात्र, मी निष्पाप आहे. मी समाजासाठी झटतो आणि समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणीही बाहेर येत नव्हते, त्यावेळी मी कोविड सेंटर सुरू केलं. पक्षासाठी काम केलं. मात्र, अचानक नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. परंतु, ज्या पक्षाने माझ्यावर कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो, महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पानी का पानी होईल, असा इशारा सुधाकर बडगुजर यांनी दिला.

हेही वाचा – Sudhakar Badgujar : अखेर बावनकुळेंची उपस्थिती; पार पडला सुधाकर बडगुजर यांचा भाजपा पक्षप्रवेश

निष्ठेने काम करणार

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्तुतीसुमने उधळताना सुधाकर बजगुजर म्हणाले की, महाराष्ट्रात जो पहिला प्रकल्प सांडपाण्यातून वीज निर्मितीचा केला, तो मुख्यमंत्र्यांनी दिला होता. ते दूरदृष्टीचे नेते आहेत. त्यामुळे आता भाजपात प्रवेश झाल्यानंतर गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण जे मार्गदर्शन करतील, त्याचे मी पालन करेन आणि निष्ठेने काम करेन, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी आपलं भाषण संपवलं.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : मला वाटले की… बडगुजरांच्या पक्ष प्रवेशाबाबत बावनकुळेंचे स्पष्टीकरण



Source link

Comments are closed.