Thackeray and pawar thackeray brothers and the uncle and nephew may be reunited in maharashtra politics
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विस्कटलेली घडी पुन्हा बसणार असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील दोन महत्त्वाच्या कुटुंबामध्ये फूट पडली आहे. त्यानुसार, दोन्ही ठाकरे बंधू वेगळे झाले आहेत तर, पवार कुटुंबातील काका-पुतण्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. पण आता ही दरी आणि ते वेगळेपण लवकरच दूर होऊन पुन्हा मनोमिलन होणार, असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विस्कटलेली घडी पुन्हा बसणार असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील दोन महत्त्वाच्या कुटुंबामध्ये फूट पडली आहे. त्यानुसार, दोन्ही ठाकरे बंधू वेगळे झाले आहेत तर, पवार कुटुंबातील काका-पुतण्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. पण आता ही दरी आणि ते वेगळेपण लवकरच दूर होऊन पुन्हा मनोमिलन होणार, असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. अशात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू तर, शरद पवार आणि अजित पवार हे पवार कुटुंबातील काका-पुतण्या एकत्र येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (thackeray and pawar thackeray brothers and the uncle and nephew may be reunited in maharashtra politics)
काका-पुतण्याचं मनोमिलन होणार?
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी दोन्ही पवारांमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अधिकारी देखील उपस्थित होते. साखर संकुलातील बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठक देखील झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार शरद पवारांसोबत बैठका किंवा कार्यक्रम टाळत असल्याचं दिसून येत होतं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार हे जाहीरपणे शरद पवार यांच्यासोबत बैठक आणि कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. अशात आज सोमवारी (दि. 21) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सर्वात आधी AI तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात कसा वापर करावा, या संबंधित बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंदर्भात काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
काका-पुतण्यात अनेकदा एकत्र
- वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मागील बैठकीला अजित पवार आले होते. त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीत चर्चा देखील केली होती.
- सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते. तर कार्यकारी मंडळावर अजित पवार असल्याने ते देखील त्या बैठकीला उपस्थित होते.
- आज पुन्हा वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अजित पवार आणि शरद पवार एकत्र उपस्थित राहिले आहे.
ठाकरे बंधू युतीतून येणार एकत्र?
एकीकडे पुण्यात काका-पुतण्यामध्ये सातत्याने बैठका होत आहेत तर, दुसरीकडे ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याबाबतचा सूर पाहायला मिळत आहे. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका कार्यक्रमात मुलाखत देताना दोघांमधील वाद बाजूला ठेवण्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी देखील वाद बाजूला ठेवायला तयार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी झालेली नाती पुन्हा एकत्र येतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा – Ashwini Bidre Case : मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप, सहआरोपींना प्रत्येकी 7 वर्षांचा कारावास
Comments are closed.