Uddhav Thackeray On Raj Thackeray can raj and uddhav thackeray come together in maharashtra politics news in marathi
भारतीय कामगार सेना ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. यासभेत भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे.
Uddhav Thackeray On Raj Thackeray मुंबई : भारतीय कामगार सेना ५७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी झाली. यासभेत भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. ‘मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे’, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. (Uddhav Thackeray On Raj Thackeray can raj and uddhav thackeray come together in maharashtra politics news in marathi)
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो आहे. माझी एकच अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की, गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जात आहे, तेव्हाच जर विरोध केला असता तर, आज ते सरकार बसलं नसतं, आज तिथे महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यातही महाराष्ट्राच्या हिताचं सरकार बसलं असतं. त्याचवेळेला हे कामगार कायदे केराच्या टोपलीत टाकले असते”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“पण त्यावेळी पाठिंबा द्यायचा, नंतर विरोध करायचा. मग परत तडजोड करायची, असे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हित पहिलं. मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला मी घरी बोलवणार. त्याच्या घरी मी जाणार नाही. त्याच्या पंगतीलाही मी बसणार नाही. हे पहिलं ठरवा आण मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. मी आज सांगतो माझी कोणासोबत भांडणं नव्हती. मिटवून टाकली सगळी भांडण. त्यावेळी सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं की शिवसेनेसोबत म्हणजे माझ्यासोबत एसंशी नाही. पण ठरवा कोणासोबत जाऊन मराठी आणि महाराष्ट्राचं हित होणार आहे. माझ्याबरोबर की भाजपसोबत मग काय द्यायचा तो पाठिंबा बिनशर्त द्या”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Raj Thackeray : माझा इगो नाही, एकत्र येणंही कठीण नाही पण विषय इच्छेचा; राज ठाकरेंकडून टाळीसाठी हात पुढे
Comments are closed.