Vaibhavi Deshmukh HSC Result scored 85.33 percent in Class 12th putting aside grief of his father Santosh Deshmukh murder


आज सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 91.88 लागला आहे. पण या सर्व निकालाच चर्चा सुरू आहे ती वैभवी देशमुख हिच्या निकालाची. कारण डोक्यावर दु:खाचा डोंगर असतानाही वैभवीने या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळवले आहेत. तिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडेंचे नाव समोर आले. कारण धनंजय मुंडे यांचाच जवळचा सहकारी वाल्मीक कराड याने ही हत्या घडवून आणली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून मोर्चे निघाले. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची लेक वैभवी देशमुख, भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन केली. आजही संतोष देशमुखांना न्याय मिळाला नसून त्यांचे कुटुंब यासाठी लढा देत आहे. मात्र, या दुःखाच्या काळातही संतोष देशमुखांची लेक वैभवी हिने मोठ्या जिद्दीने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. ज्यामुळे तिचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. (Vaibhavi Deshmukh HSC Result scored 85.33 percent in Class 12th putting aside grief of his father Santosh Deshmukh murder)

आज सोमवारी (ता. 5 मे) दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 91.88 लागला आहे. पण या सर्व निकालाच चर्चा सुरू आहे ती वैभवी देशमुख हिच्या निकालाची. मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांनी लेकीने डॉक्टर व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी वैभवी जोमाने तयारी करत होती. पण डिसेंबर महिन्यात संतोष देशमुखांसोबत होत्याचे नव्हते झाले आणि वैभवीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. बारावीची परीक्षा जवळ येत होती, पण वडिलांना न्याय मिळवून देण्याकरिता वैभवी काका धनंजय देशमुख यांच्यासोबत आंदोलनात उतरली होती. पण तरी सुद्धा तीने घरच्यांना आधार देत, आपले दुःख मनात साठवून आंदोलनही केले आणि बारावीच्या परीक्षेचा अभ्यासही केला.

हेही वाचा… HSC Exam Result 2025 : बारावीचा निकाल 91.88 टक्के, कोकणचा प्रथम क्रमांक; यंदाही मुलींचीच बाजी

आज सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि वैभवी देशमुखला या परीक्षेत 85.33 टक्के गुण मिळाल्याची माहिती समोर आली. वैभवीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत. डोक्यावर दु:खाचा डोंगर असतानाही वैभवीने मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. आज माझे वडील असते तर तर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असती, पण ते आज नाहीत याचे मला दुःख होत आहे, असे म्हणत वैभवी देशमुख हिने भावना व्यक्त केल्या आहेत. तर, च्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचेही यावेळी तिच्याकडून सांगण्यात आले. वैभवीने रविवारी (ता. 4 मे) झालेची NEET ची परीक्षा सुद्धा दिली आहे. पण मानसिक स्थिती नसताना त्या परीक्षेचा अभ्यास केल्याने त्या परीक्षेत 150 च्या खाली गुण मिळतील, असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे.



Source link

Comments are closed.