Varsha Gaikwad gives strong response to Chandrashekhar Bawankule’s statement to split the Congress party
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडा आणि त्यांचा पक्ष खाली करा असा कानमंत्र दिला होता. बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आता काँग्रेस पक्षातील नेते बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.
मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. महापालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी महायुतीकडून महाविकास आघाडीच्या आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम सध्या सुरू आहेत. याचपार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडा आणि त्यांचा पक्ष खाली करा असा कानमंत्र दिला होता. बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर आता काँग्रेस पक्षातील नेते बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे. (Varsha Gaikwad gives strong response to Chandrashekhar Bawankule’s statement to split the Congress party)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दीड वर्षांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील जुगार खेळतानाचा फोटो ट्वीट केला होता. याच फोटोचा दाखल देत वर्षा गायकवाड म्हणाल्या की, बावनकुळे हाँगकाँगला गेले होते आणि तिथे जसे तीन कोटी रुपये त्वरित संपले, तशी काँग्रेस संपण्याची गोष्ट त्यांनी करू नये. हाँगकाँगमध्ये जुगाराचा खेळ होता, पण इथे लोक काँग्रेससोबत विचारधारेने जोडले गेले आहेत. लोकांची काँग्रेसप्रती श्रद्धा आणि निष्ठा आहे. त्यामुळे काँग्रेस फोडा, असे बोलणारे खूप आलेत. बावनकुळे यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असा हल्लाबोल गायकवाड यांनी केला.
हेही वाचा – Beed : महिनाभरापासून पाणीपुरवठा खंडीत, संतापलेल्या नागरिकांकडून अजितदादांच्या फोटोला अभ्यंग स्नान
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष हा जनमानसातला विचार आहे. तसेच 135 वर्ष जुना पक्ष आहे. तरीही एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जर असे बोलत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, राजकारण एवढ्या घाणेरड्या पातळीवर करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हा प्रकार भाजपाने सुरू केला आहे. मंत्रिमंडळात त्यांचे आमदार बघा, अधिकाधिक लोक हे बाहेरून आलेले आहेत. सगळे उपरे आहेत. स्वतःच्या कार्यकर्त्याला त्यांनी कुठे संधी दिली आहे? असा प्रश्नही वर्षा गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
काय म्हणाले होते बावनकुळे?
पुण्यात झालेल्या पदाधिकारी बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्ष खाली करून टाका असे विधान केल्याचे म्हटले जात आहे. बावनकुळे यांच्या व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये ते बोलताना ऐकायला येते की, संग्राम थोपटे यांच्यासारखे जे कोणी दिसतील त्यांना पक्षात घेऊन या. तुम्ही काँग्रेस पक्ष खाली करून टाका. काँग्रेस पक्ष तुम्ही जेवढा कमी कराल, तेवढा तुमचा फायदा आहे. माझं काय होईल याची काळजी तुम्ही अजिबात करू नका. देवेंद्र फडणवीस आहेत, मी स्वत: आहे, मुरलीधर मोहोळ आहेत, अमित शहा आहेत. आम्ही तुम्हाला न्याय देणार की त्यांना देणार, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : भाजपासोबत राहून ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, राऊतांचा अजित पवारांना टोला
Comments are closed.