Weather update pre monsoon rains hit the state warning of heavy rains red alert for sindhudurg along with konkan coast in marathi
Rain Update : मुंबई : काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना झोडपून काढले आहे. ऐन मे महिन्यातच सुरू झालेल्या या अवकाळी पावसामुळे सामन्यांसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यंदा मान्सून वेळेआधीच येणार असून सध्या दोन दिवस कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात केरळ, कर्नाटक, गोवा, कोकणासह गुजरातपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (weather update pre monsoon rains hit the state warning of heavy rains red alert for sindhudurg along with konkan coast)
हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरी भागाला अतिमुसळधार तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात सोसाट्याचा वारा वाहणार असून या वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असण्याची शक्यता आहे. कोकणात अशी परिस्थिती असताना दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या घाटमाथ्यावरील भागामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो. तसेच, पुणे, सातारा, अहिल्यानगर आणि कोल्हापूर परिसरात पूरजन्य परिस्थिती येऊ शकते.
हेही वाचा – Live Update : पुण्यातील खराडी परिसरातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा
मान्सूनपूर्व पावसाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढले आहे. चार दिवसांपासून सिंधुदुर्गात पाऊस कोसळतो आहे. पुढील दोन दिवस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून तिन्ही जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई तसेच आसपासच्या जिल्ह्यांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर वाढणार आहे.
एकीकडे मान्सूनची सुरळित वाटचाल सुरू आहे. तर त्याआधीच मान्सूनपूर्व पावसाने राज्यात शेतीची दाणादाण उडवून दिली आहे. अनेक भागांत ताशी 30 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र बनत चालल्याने नागरिकांमध्ये घबराट आहे. पुढील दोन दिवस तिन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. दोन दिवस अतिवृष्टी होणार असून समुद्रालगतच्या भागात या पावसामुळे नुकसान होण्याची भीती आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आदी भागांतही पावसाची जोरदार हजेरी कायम राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झालेच आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
पुढील दोन दिवसही धुवॉंधार बरसण्याचा इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्री वादळ तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले ते येत्या 36 तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले असून त्याची पुढील वाटचाल उत्तरेकडे असणार आहे. या चक्रीवादळामुळे मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Comments are closed.