Why murder for murder: A minor’s game


सातपूरमध्ये तीन महिन्यांपूर्वी १७ वर्षीय मुलाच्या खूनाचा बदला टोळक्याने सोमवारी (दि.२८) घेतला. टोळक्याने भरदिवसा सिडकोतील कामटवाडे परिसरात सातपूर खूनातील संशयित आरोपीचा दगडाने ठेचून त्याचा गेम केला. या घटनेमुळे अंबडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांच्या मागावर पोलीस आहेत. करण उमेश चौरे (वय १७, रा. संत कबीर नगर, नाशिक) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. (Why murder for murder: A minor’s game)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश चौरे याचा गंगापूर हद्दीतील एका खूनाच्या गुन्ह्यात समावेश असल्याचा संशय असल्याने त्यावर कायदेशीर कार्यवाही सुरु होती. वय कमी असल्याने तो बालसुधारगृहात होता. मात्र, आठ दिवसांपूर्वी तो बालसुधारगृहातून बाहेर आला होता. त्याने स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे आई-वडिलांना सांगितले होते. तो सिडकोतील कामटवाडा येथे एका मित्राच्या घरी राहत होता.

करण चौरे सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेदरम्यान कामठवाडा स्मशानभूमी रोडने जात होता. त्यावेळी संशयित सहा जण आले. काही समजण्याच्या आत संशयितांनी करणला मारहाण करण्यास सुरुवात केली. टोळक्याने करणच्या डोक्यात दगड व फरशीने वर्मी घाव केले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. ही बाब पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी करण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे घटनास्थळी येत पाहणी केली. हल्लेखोरांच्या शोधार्थ पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी आकाश चौरे यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

तू आमच्या परिसरात यायचे नाही, असा इशारा देवूनही नगरात आल्याने अरुण बंडीचा खून

मृत अरुण बंडी (वय १७, रा. कामगारनगर, सातपूर, नाशिक) हा संत कबीर नगरमध्ये असायचा. त्यातून संशयितांशी त्याचे वाद सुरु होते. तू आमच्या परिसरात यायचे नाही, या मुद्द्यावरून संशयितांनी अरुण बंडीचा ८ मार्च २०२५ रोजी रात्री ११.३० वाजेदरम्यान खून केला. हल्लेखोरांमध्ये मृत करण चौरे हासुद्धा असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • मृत करण चौरे हा वडिलांना प्लम्बिंगच्या कामात मदत करायचा. करणच्या पश्चात आई, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
  • सुमारे सहा हल्लेखोरांनी करण चौरेवर हल्ला केला.
  • ‘बदला घेतला, बदला घेतला’, असे ओरडत दुचाकीने हल्लेखोर फरार



Source link

Comments are closed.