Youth injured in assault dies


किरकोळ भांडणाच्या कारणावरून सुमारे तीन जणांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा चौथ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दीपक महादेव जोगदंड (वय 23 रा. वृंदावन नगर, अंबड, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Youth injured in assault dies)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दीपक महादेव जोगदंड यास २४ एप्रिल २०२५ रोजी अज्ञात कारणाने त्याचा मेहुणा व इतरांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या डोक्यास व बरगडीला मार लागला होता. त्यास उपचारासाठी त्याची आई कल्पना जोंगदंड यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारास प्रतिसाद देत नसल्याने त्यास मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी (दि.२७) मृत्यू झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.



Source link

Comments are closed.