Ratnagiri News – सुरक्षेच्या कारणास्तव रघुवीर घाट पर्यटनासाठी १० आॕगस्टपर्यंत बंद
पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दि. ९ जुलैपासून ते दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. डोंगर भागात दरड कोसळण्याची आणि जिवीत हानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन खेडच्या उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जाहिर केला आहे
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४६१ (रघुवीर घाट) च्या दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे.तसेच डांबरी पृष्ठभाग आणि साईडपट्टी खचली आहे. रस्त्यावर माती व दगड आले असून डांबरी रस्त्याला तडे जाण्याची, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने एस.टी. महामंडळाच्या बसना हा मार्ग खुला रहाणार आहे.
Comments are closed.