जलतरणात प्रतीक्षा डांगी, मिहिर आंब्रे यांना रौप्य! ऋषभ दासला, ऋतुजा राजधन्या यांना कांस्य
हल्दवानी: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगीला महिलांच्या 100 मीटर बॅक स्ट्रोक्स प्रकारातही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. एका सेंकदाच्या फरकाने तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. मिहिर आंब्रेने 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या ऋषभ दासला 100 मीटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात, तर ऋतुजा राजधन्या हिला 50 मिटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक जिंकले.
महिलांच्या 100 मीटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात महाराष्ट्राच्या प्रतीक्षा डांगी हिने 1 मिनिट 7.52 सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. बंगालच्या मोंडल सौब्रितीने 1 मिनिट 6.66 सेकंद वेळेसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर ओडिशाच्या रॉय प्रत्यासाला (1:07:77से) कांस्यपदक मिळाले.
पुरुषांच्या 100 मीटर बॅक स्ट्रोक्स प्रकारात महाराष्ट्राच्या ऋषभ दासला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने 56.80 सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. श्रीहरी नटराज (56.26 से) व आकाश मानी (56.36 से) या कर्नाटकच्या जलतरणपटूनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकावर मोहोर उमटवित वर्चस्व गाजविले.
50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्य अन् कांस्य!
मिहिर आंब्रेने 50 मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या झोळीत आणखी एक पदक टाकले. त्याने 25.02 सेकंद वेळेसह हे रूपेरी यश मिळविले. तमिळनाडूचा बी रोहित आणि हरियाणाचा हर्ष सरोहा यांनी अनुक्रमे सुवर्ण व कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 50 मीटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राच्या ऋतुजा राजधन्या हिने 29.12 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले.
महत्त्वाच्या बातम्या-
अभिषेक शर्माने लावली इंग्लंडची वाट; तुफानी शतक ठोकून रचला विक्रम
महाराष्ट्राचा पदकांचा सुवर्णमहोत्सव, पदक तक्यात दुसर्या स्थानी झेप
आंद्रे रसेलचा वर्ल्ड रेकाॅर्ड! टी20 क्रिकेटमध्ये 9,000 धावा पूर्ण करत रचला इतिहास
Comments are closed.