वाराणसीत मणिकर्णिका घाट तोडल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचा मूकमोर्चा, सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अंबादास दानवे यांचे आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार व भारतीय कम्युनिष्ट पक्ष यांच्या वतीने मूक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर भाजप सरकारने बुलडोझर चालवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर दिली.

दानवे यांनी केलेल्या ट्विटनुसार, हे मूक धरणे आंदोलन 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता संभाजीनगरमधील कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ होणार आहे. या आंदोलनासाठी सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Comments are closed.