महायुतीचा विधिमंडळ समिती वाटपाचा फॉर्म्युला ठरला, 11-7-4; मंत्रीपद हुकलेल्या नेत्यांनी संधी

महाराष्ट्र राजकारण: विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दोन्ही दिवस  वादळी ठरले. पहिल्या दिवशी विरोधीपक्षांनी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर याच दिवशी रात्री संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आले. यामुळे अखेर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समितीचा फॉर्म्युला आता अखेर ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Legislative Committee)

या बैठकीत भाजपला 11 शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 असा आत्तापर्यंत फॉर्म्युला ठरलेला आहे . दरम्यान,उर्वरित सात समितिंबाबत निर्णय अजूनही बाकी आहे. इतर अपक्षांसाठी या जागा ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.  मंगळवारी धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यानंतर तातडीने समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे हे नेते बैठकीसाठी उपस्थित होते. (Mumbai)

समित्यांचे वाटप कसे होणार?

लोकलेखा समिती,आहार व्यवस्था समिती,धर्मदाय समिती,अनुसूचित समिती,विशेष हक्क समिती,मानव हक्क समिती तसेच आश्वासन समिती..या समित्यांमधून मंत्रीपद हुकलेल्या भाजप आमदारांचे राजकीय पुनर्वसन केलं जाणार आहे .शिवाय ज्येष्ठतेनुसार समित्यांचे वाटप करणार असल्याचे सांगण्यात येतंय .

राज्यातील महत्त्वाच्या महामंडळांबाबतही या बैठकीत चर्चा झाली असून काही महामंडळांबाबत अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात येतं त्यासाठी पुन्हा एकदा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार असून त्यात अंतिम महामंडळाची यादी ठरेल .जिल्हा निहाय समितीवरही त्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली .शिवसेनेकडून मंत्रीपद न मिळालेल्या आमदारांना विधिमंडळ समित्या,महामंडळाचे वाटप करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न महायुतीतून सुरू आहे.

11 समित्यांवर भाजपने नाव कोरले

राज्यविधी मंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात .यात महायुतीत भाजपचा वाटेला 11 समित्या आल्या आहेत .या समित्यांवरील अध्यक्षांची निवड भाजपकडून करण्यात आली आहे .आतापर्यंत भाजपा करा शिवसेना साथ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 4 अशा जागांचा फॉर्म्युला ठरलेला होता .तर उर्वरित सात समितिंबाबत निर्णय बाकी होता .या जागा अपक्षांसाठी ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली .यातील 11 महत्त्वाच्या समित्यांवर भाजप आमदारांची वर्णी लागली आहे.

हेही वाचा:

Ajit Pawar & Dhananjay Munde: पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या जीवावर राजकारण नको, स्वावलंबी व्हा; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला

अधिक पाहा..

Comments are closed.