नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, महायुतीतील वाद चव्हाट्यावर

पालमंत्रीपदावरून महायुतीतील चव्हाट्यावर आला आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याचा शासन निर्णयही जाहीर करण्यात आला आहे. महायुती सरकारच्या निर्णयामुळे मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यामध्ये आदिती तटकरे यांना रायगड, तर गिरीश महाजन यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सूपुर्द करण्यात आली होती. मात्र 24 तासांतच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे.

Comments are closed.