माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 26 लाख महिला अपात्र, सरकार करणार कारवाई

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपुर्वी मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी मतांसाठी निकष किंवा पात्र, अपात्र अशी कोणतिही खातरजमा न करता केवळ मतांसाठी योजना आणली. मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून अनेक महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आहे. आतापर्यंत या योजनेतून 26 लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती महिला व बाल कल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच या महिलांवर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच या महिलांवर कारवाई देखील करण्यात येणार आहे.

”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी (Physical Verification) उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरू राहील”, असे अदिती तटकरे

Comments are closed.