बदलांचं स्वागतच!
>> महेश काळे, प्रसिद्ध शास्त्राीय गायक
आपलं संगीत, आपला संस्कृतीचा जो वारसा आहे, तो टिकविण्याकरिता काय बदल करायला लागतील, त्या बदलांचे मी स्वागत करतो.
जे वाहत नाही, नुसतं साठतं ते आटतं… पाण्यासारखं. तसंच विचारांचं आहे. त्यामुळे उत्खनन, नवनिर्मिती होणं गरजेचं आहे. जर एक गोष्ट शाश्वत असेल या जगामध्ये तर ती म्हणजे बदल आणि बदल हा प्रत्येक येणाऱ्या आव्हानाप्रमाणे बदलत जातो.
तुम्ही पहा, संगीताला पहिल्यांदा राजाश्रय मिळाला. तो राजाश्रय गेल्यानंतर गाणाऱया गवयांनी काय केलं तर मैफली करायला लागले. राजे त्यांना बोलवायला लागले, मग व्यवहार आला. तिकीट लावून मैफली व्हायला लागल्या. मग देशात इंग्रजांचे सरकार येऊन गेल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा ‘एआयआर’ आलं. त्यामुळे ऑल इंडिया रेडिओ आलं. रेडिओमुळे मोठा बदल झाला. त्यावेळच्या ध्वनिफिती रेकॉर्ड करण्याच्या डय़ुरेशनची मर्यादा होती. त्यावेळेतच गाणं गायचं हा एक बदल आला. त्यामुळे पूर्वीच्या पलुस्कर यांच्या रेकॉर्ड तीन मिनिटांच्या आहेत. अगदी वेस्टर्न म्युझिककडे आपण धबधबा असतो ना जो लांबून पाहायचा, तसं त्याकडं पाहयचं. आपण सहलीला गुजरातमध्ये गेलो की तिथं त्या भाषेचे दोन-चार शब्द तुम्ही शिकता. का तर, त्यांना आपुलकी वाटावी आणि आपणही समृद्ध व्हावं एका भाषेने. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या संगीत प्रकाराबरोबर आपल्या शास्त्राrय संगीताचं संभाषण कसं होईल हे शिकायला हवं. आजकालच्या मुलांना बदल जास्त सुचत असतात. कारण पिबदल घडवून आणते. मुलाचं काय म्हणणं आहे ते समजून घेऊन, त्याला कुठल्या पद्धतीने दिशा देता येईल, बदल घडणारच असेल तर या वाटेने बघा. तिथे आपण समृद्धी शोधायला हवी. शेवटी आपलं संगीत, आपला संस्कृतीचा जो वारसा आहे, तो टिकविण्याकरता काय बदल करायला लागतील, त्या बदलांचे मी स्वागत करतो. तुम्ही पूर्वी पहा, देवाच्या आरत्या दोन-तीन तास चालायच्या. आता तसं होत नाही 15 मिनिटात संपतं. पण म्हणजे देवावरची भक्ती कमी झाली आहे का? तर अजिबात नाही. देवावरची भक्ती कमी झाली असती तर, लोकांनी आरती करायचं सोडून दिलं असतं. शास्त्राrय संगीत, लोकं करतात याचा अर्थ त्यांचं प्रेम आहे, मग त्यांना निराश करण्याच्या ऐवजी जे करतायेत त्यामध्ये प्रोत्साहन, उत्तेजन आणि दिशा दाखून देऊन ते कसं समृद्धीकडे घेऊन जाता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.
शास्त्राीय संगीताविषयी लेखन मोठय़ा प्रमाणात व्हायला हवं, त्यातून ज्ञानार्जन होईल. जसं डॉक्टरने इलाज करण्यासाठी इमारत बांधणारे लोक पण लागतात, अॅडमिनचे लोक लागतात, नर्सिंगची पण लागतात, पेशंट आणि डॉक्टरही हवेत, तसं गाण्याचंही आहे. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन, घडतंय तसं घडू द्या असं न करता, अर्थपूर्ण आणि ठरवून बदल घडवायला हवा. कारण त्यासाठी आपल्याकडे एकच गोष्ट तो म्हणजे वारसा. जो कोणाला विकत घेता येत नाही.
संगीतातला अनोखा प्रयोग ‘अभंगवारी’
वारीच्या प्रवासाची जशी वाट तीच असते, पण अनुभव वेगळा असतो. काही गोष्टी नव्याने घडतात, त्यामुळे जी अपेक्षापूर्ती असते ती होईल. पण त्याच वेळी काही नवीन गोष्टी जसं वारीत काही वारकरी नवीन येतात. तसंच ‘अभंगवारी’ या कार्यक्रमामध्ये माझ्या काही नवीन चाली देण्यात आल्या आहेत. त्या पहिल्यांदा रसिकांना ऐकायला मिळाल्या. मी नवीन चाली दिल्या आहेत. या वर्षी नवीन ओळी सुचल्या आहेत, ज्या विठुरायावर आहेत. काही गोष्टी नव्याने प्रस्तुत केल्या. त्यामुळे जुन्या, नव्या गोष्टी, जे जुन्यातलं मी गायलं नाही ते गायचा प्रयत्न करणार, जे लोकांना आवडतं त्या गोष्टी ऐकवायचा प्रयत्न केला आहे.
Comments are closed.