माहीम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे मुकेश करबट विजयी, शिंदे गटाचा धुव्वा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

माहीम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुकेश करबट बहुमतांनी विजयी झाले. मंगळवारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत करबट यांना १३ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कुणाल नारले यांना ४ मते मिळाली. या निवडणुकीत एक मत बाद झाले आहे.

नोव्हेंबर २०२३मध्ये झालेल्या माहीम ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती अरुण पाटील यांची सरपंचपदी तर नरोत्तम राऊत यांची उपसरपंचपदी निवड झाली होती. ठरलेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळानुसार नरोत्तम राऊत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. उपसरपंचपदासाठी शिवसेनेचे मुकेश करबट आणि शिंदे गटाचे कुणाल नारले यांच्यात थेट लढत झाली.

उपसरपंचपदी निवडून आल्यानंतर मुकेश करबट यांचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख विकास मोरे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अजय ठाकूर, माजी सरपंच प्रीती पाटील, माजी उपसरपंच नरोत्तम राऊत, सदस्य रॉकी तांडेल, मनीष पाटील, अभिजित पाटील, अरुण पाटील, नमिता राऊत, रुचिता चुरी आदी उपस्थित होते.

Comments are closed.