Mahrashtra cm devendra fadnavis reaction on cold war with eknath shinde said sanjay raut wants to compete with salim javed in marathi
कोणतीही कथा रचण्यात त्यांची स्पर्धा चित्रपट पटकथा लेखक सलीम – जावेस यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.
Devendra Fadnavis On Cold War : मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने सुरू आहेत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यातील शीतयुद्ध हे वावड्या असल्याचे म्हटले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. कोणतीही कथा रचण्यात त्यांची स्पर्धा चित्रपट पटकथा लेखक सलीम – जावेस यांच्यासोबत असल्याचे ते म्हणाले. सोमवारपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सत्ताधाऱ्यांनी चहापानाचे आयोजन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. (mahrashtra cm devendra fadnavis reaction on cold war with eknath shinde said sanjay raut wants to compete with salim javed)
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये कोणतेही युद्ध नाही. जे आम्हा दोघांना ओळखतात, त्यांना हे माहीतच असेल की, आम्ही दोघे जेव्हा एकत्र येतो तेव्हा आम्ही काय करतो. महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने काम करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
हेही वाचा – Assembly Session 2025 : विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, अजित पवारांकडून या नावावर शिक्कामोर्तब?
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याचे दावे देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी फेटाळून लावले. एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला आपण स्थगिती दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पहाटे चार वाजता एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन फडणवीसांची तक्रार केल्याचा दावा देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. तो देखील फडणवीसांनी यावेळी फेटाळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत सध्या प्रख्यात चित्रपट पटकथाकार सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्याशी स्पर्धा करत आहेत. तर एकनाश शिंदे म्हणाले की, ठाकरे गटाच्या या नेत्याच्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. दरम्यान, गेले काही दिवस विविध मुद्द्यांवरून शिंदे – फडणवीसांमध्ये वाद असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या.
एकनाथ शिंदे यांना यावेळी मला हलक्यात घेऊ नका, याविषयी विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, मला जे हलक्यात घेतात, त्यांच्यासाठी हे विधान होते. आणि त्यांना मी जो संदेश द्यायचा तो दिला असल्याचेही ते म्हणाले. यावेळी फडणवीसांनी मी शिंदेंना हलक्यात घेत नाही, अशी टिप्पणी केली.
हेही वाचा – Himani Narwal murder : हिमानी हत्या प्रकरणात एकाला अटक, पोलीस तपासात धक्कादायक माहिती…
Comments are closed.