अमेरिकेत टेकऑफदरम्यान विमानाच्या लॅंडिंग गिअरला आग, सर्व 173 प्रवाशांची सुखरूप सुटका

अमेरिकेतील डेनवर विमानतळावर एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्याचे वृत्त आहे. विमानाच्या लँडिंग गियरला आग लागल्यामुळे पायलटला आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान या आपत्कालीन स्थितीत सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेत कोणत्याही जीवितहानी झालेली नाही.आगीचे कारण शोधण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.
अमेरिकेत टेकऑफदरम्यान विमानाच्या लॅंडिंग गिअरला आग, 173 प्रवासांना आपत्कालीन स्लाइडद्वारे बाहेर काढले pic.twitter.com/shqlohifu6
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 27 जुलै, 2025
डेनवर अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 173 प्रवासी असलेले बोईंग 737 मॅक्स विमान शनिवारी डेनवरहून मियामीसाठी रनवे 34L वरून उड्डाण घेत होते. यावेळी विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाल्यामुळे लँडिंग गियरला आग लागली. त्यामुळे तातडीने विमानाला रनवेवर थांबवावं लागलं. यानंतर सतर्कतेने सर्व 173 प्रवासांना आपत्कालीन स्लाइडद्वारे बाहेर काढण्यात आले. तसेच डेनवर अग्निशमन विभागाने विमानाला लागलेली आग आटोक्यात आणली.
दरम्यान या दुर्घटनेत विमानातील सर्व 173 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे, अशी माहिती डेनवर विमानतळाने दिली आहे. दरम्यान विमानात टायरशी संबंधित समस्या असल्यामुळे ते विमान आता सेवेतून काढून टाकण्यात आलं आहे. फेडरल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन (FAA) ने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
Comments are closed.