मुंबई विमानतळावर टळली मोठी दुर्घटना, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला

मुंबई विमानतळावर शनिवारी एक मोठी दुर्घटना टळली. बँकॉकहून मुंबईला जाणारे इंडिगो एअरबस ए३२१ विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवर आदळले. ही घटना पहाटे ३.०६ वाजता धावपट्टी २७ वर घडली. खराब हवामान आणि मुसळधार पावसात विमानाचा खालचा भाग धावपट्टीवर आदळला, ज्याला विमान वाहतुकीच्या भाषेत टेल स्ट्राइक म्हणतात. या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
याबाबत माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, १६ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत प्रतिकूल हवामानामुळे कमी उंचीवर उड्डाण करत असताना इंडिगो एअरबस ए३२१ विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची औपचारिक चौकशी करू आणि लवकरच आदेश जारी केला जाईल.” या घटनेनंतर विमानाला उड्डाणावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे आणि संपूर्ण चौकशी आणि दुरुस्तीनंतरच पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल.
Comments are closed.