विहिंप नेते प्रभाकर हत्या प्रकरणात मोठी कारवाई.

युएई कनेक्शन असलेल्या आरोपीला अटक

वृत्तसंस्था

जालंधर

2024 साली पंजाबच्या नांगल येथे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रभाकर यांच्या टार्गेटेड किलिंग प्रकरणी एनआयएने आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. युएईत काम करणारा आणि प्रतिबंधित संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’च्या (बीकेआय) जर्मनीतील हँडलर्स अन् भारतात शस्त्रास्त्र पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारांदरम्यान दुव्याचे काम करणारा हा आरोपी आहे.

मनवीर राम याने हत्येसाठी शस्त्रास्त्रs पुरविली होती. मनवीरचे काम विदेशातील हँडलर्स अन् भारतातील त्यांच्या साथीदारांदरम्यान संपर्क प्रस्थापित करून देणे होते.  मनवीरने टार्गेटेड किलिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रभाकर यांच्या हत्येचा कट बीकेआयच्या जर्मनीतील हँडलर्सनी रचला होता, हरजीत सिंह उर्फ ल•ाr आणि कुलबीर सिंह उर्फ सिद्धू अशी या हँडलर्सची नावे होती असे एनआयएचे सांगणे आहे.

13 एप्रिल 2024 रोजी पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात प्रभाकरन यांच्यावर दोन    हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. प्रभाकर हे त्यावेळी विहिंपचे नांगल अध्यक्ष होते. याप्रकरणी लुधियाना येथून धर्मेंद्र कुमार उर्फ कुणाल याला ऑगस्ट 2024 मध्ये अटक करण्यात आली होती.

Comments are closed.