दुखापतीमुळे एनगिडी मालिकेतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी उजव्या पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. टायटन्स आणि डॉल्फिन्स यांच्यात झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान एनगिडीच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीत हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचे निदान झाले. एनगिडीला आता पुनर्वसन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे 24 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला तो मुकणार आहे.
Comments are closed.